Sarkari Naukri : TMC मध्ये नोकरीची सूवर्णसंधी, 53 हजार पगार... पाहा कसा कराल अर्ज!

Job Alert: ज्या उमेदवार यासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत त्यांनी लवकरात लवकर विहित नमुन्यात अर्ज करावा. त्यासाठी TMC च्या अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल.

Updated: Jan 9, 2023, 06:48 PM IST
Sarkari Naukri : TMC मध्ये नोकरीची सूवर्णसंधी, 53 हजार पगार... पाहा कसा कराल अर्ज! title=
Job Alert

TMC Recruitment 2022 : गेल्या काही दिवसांपासून टाटा मेमोरिएल सेंटरमध्ये (Tata Memorial Centre) भरती प्रकिया (Job Alert) सुरू असल्याचं पहायला मिळतंय. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ आली आहे. त्यामुळे तुम्हाला जर चांगल्या पगाराची नोकरी हवी असेल तर लगेच हातातील काम सोडा आणि अर्ज भरायला घ्या, कारण TMC मध्ये या पदांसाठी अर्ज करण्याची (TMC Recruitment 2022 Last Date) अंतिम तारीख उद्या म्हणजेच 10 जानेवारी 2023 आहे. त्यामुळे लगोलग अर्ज भरून घ्या. (tmc recruitment 2022 for 360 posts last date tomorrow 10 january 2023 apply online marathi news)

ज्या उमेदवार यासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत त्यांनी लवकरात लवकर विहित नमुन्यात अर्ज करावा. त्यासाठी TMC च्या अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल. इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. टीएमसी (Tata Memorial Centre) ही एक स्वायत्त संस्था आहे जी भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाद्वारे वित्तपुरवठा आणि नियंत्रित करते.

कोणत्या जागेसाठी भरती?

TMC मध्ये एलडीसी ( LOWER DIVISION CLERK), अटेंडंट (ATTENDANT), नर्स ( NURSE) इत्यादी अनेक पदांसाठी भरती सूरू झाली आहे. एकूण 360 पदांसाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे. इथं लोअर डिव्हिजन क्लर्कची 18 पदं, अटेंडंटची 20 पदं, ट्रेड हेल्परची (TRADE HELPER) 70 पदं, नर्स-ए ची 212 पदं, नर्स-बी ची 30 आणि नर्स-कची 55 पदं भरण्यात येणार आहेत. त्यामुळे मोठी सूवर्णसंधी चालून आली आहे.

आणखी वाचा - ITR Refund 2022 : ITR भरून झालाय, आता रिफंड कधी आणि कसा मिळणार, जाणून घ्या एका क्लिकवर

पगार किती मिळणार?

दरम्यान ,या पदांसाठी अर्ज करण्याची शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगळी असणार आहे. टीएमसीच्या अधिकृत वेबसाइटवर (इथं क्लिक करा) याविषयी विस्तृत माहिती देण्यात आली आहे. या पदांवर निवड झाल्यावर पदानुसार वेतन मिळेल. लोअर डिव्हिजन क्लर्क आणि ट्रेड हेल्परचे वेतन 18,000 रुपये आहे. नर्सच्या गट A, B, C साठी अनुक्रमे 44,900, 47,600 आणि 53,100 रुपये पगार निश्चित करण्यात आला आहे.