भारतात TikTok पुन्हा दाखल होणार?

TikTok संबंधी कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे.  

Updated: Feb 15, 2021, 07:29 AM IST
भारतात TikTok पुन्हा दाखल होणार?  title=

मुंबई : भारत आणि चीन चकमकीनंतर केंद्र सरकारने चिनी ऍपवर बंदी घातली. केंद्र सरकारच्या या निर्णायानंतर चीनला मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागला होता. चिनी ऍप TiTokचा वापर भारतात देखील मोठ्या प्रमाणात वाढला होता. हा शॉर्ट व्हिडिओ ऍप बंद झाल्यामुळे अनेक TikTok प्रेमींना हिरमोड झाला. पण भारतात TikTok ऍप पुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. Bytedance कंपनी यासंबंधी मोठा निर्णय घेण्याच्या विचारात आहे. 

जर सर्व गोष्टी पूर्वपदावर आल्यातर तुम्ही TikTokचा वापर व्हिडिओ तयार करण्यासाठी करू शकता. भारतात पुन्हा TikTok ऍप दाखल होवू शकतो अशी माहीती Bytedance कंपनीच्या एका प्रवक्त्याने दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारत सरकारकडून ऍपवर लादण्यात आलेली बंदी Bytedance कंपनी उठवण्याचा प्रयत्न करत आहे. 

Bytedance कंपनी त्यांचा प्रसिद्ध TikTok ऍप भारतातील एक टेक कंपऩी Glanceला विकण्याची शक्यता आहे.  Glance ही कंपनी भारतीय कंपनी InMobi Group चालवते. या कंपनीचा देखील एक प्रसिद्ध ऍप आहे. त्या ऍपचं नाव Roposo आहे. 

टिक-टॉक जगभरात प्रसिद्ध आहे. भारतातील सुमारे 200 कोटी लोक टिक-टॉक वापरतात. भारतात Bytedance कंपनीची 7 कार्यालये होती. गुरुग्राम व्यतिरिक्त, मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू आणि चेन्नई येथे बायडेन्सची कार्यालये होती. 

भारतात बंदी होण्यापूर्वी टिक-टॉक वेगात होता पण बंदीनंतर बाईटडन्सला एका दिवसात अंदाजे 3 कोटी 64 लाखांचं नुकसान झालं आहे. 2020 साली भारतात TikTok ऍप बॅन करण्यात आला. मात्र आता Bytedanceकंपनी भारतात पुन्हा TikTok लाँच करण्याच्या विचारात आहे.