Home Loan लवकरात लवकर फेडण्यासाठी जाणून घ्या या लाखामोलाच्या Tips & Tricks

कर्ज फेडण्यासाठी काही गोष्टींचं पालन न केल्यास तुम्ही अंदाजे 50 लाख रुपयांच्या घरासाठी तब्बल 1 कोटी रुपये मोजता.   

Updated: May 28, 2022, 03:07 PM IST
Home Loan लवकरात लवकर फेडण्यासाठी जाणून घ्या या लाखामोलाच्या Tips & Tricks  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : जीवनातील एका टप्प्यावर आल्यानंतर आपलं, स्वत:चं आणि त्याहीपेक्षा हक्काचं घर असावं असंच प्रत्येकाचं स्वप्न असतं. कित्येकदा हे स्वप्न साकारही केलं जात आहे. मुख्य म्हणजे या साऱ्यामध्ये गृहकर्ज अर्थात होम लोन सुविधेचा मोठा हातभार लागत आहे. पण, तुम्हाला माहितीये का होम लोन घेतल्यानंतर ते फेडता फेडता अनेकांच्याच नाकी नऊ येतात. (tips and tricks for fast repayment of home loan Early Repayment)

आता असं का होतं, याची कारणं जाणून घेतलीयेत कधी? कर्ज फेडण्यासाठी काही गोष्टींचं पालन न केल्यास तुम्ही अंदाजे 50 लाख रुपयांच्या घरासाठी तब्बल 1 कोटी रुपये मोजता. 

उदाहरणार्थ, तुम्ही 50 लाख रुपयांचं लोन 7 टक्के व्याजदराने घेतल्यास 20 वर्षे या कर्जाचे हप्ते तुम्हाला फेडावे लागतात. या अनुषंगाने तुम्हासा 43 लाख रुपयांहून अधिकचा व्याज भरावा लागतो. चक्रावून गेलात ना? 

आपल्या मेहनतीचे पैसे तुम्ही या अशा पद्धतीने गमावताय, हे अजिबातच सुखावह नाही. पण, घाबरु नका कारण तुम्हाला ही चूकही सुधारता येऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया होम लोन लवकरात लवकर संपवण्याचे पर्याय. 

(Home loan) होम लोन परताव्याचे दोन मार्ग असतात. एक म्हणजे ईएमआय अर्थात लोनचा हप्ता वाढवणं आणि दुसरा म्हणजे थोडं थोडं कर्ज फेडत राहणं. यामधील पहिला पर्याय निवडल्यास आपल्याला दोन फायदे मिळतात. एकतर आपल्याला इनकम टॅक्समध्ये फायदा मिळतो. कारण इएमआयचे दोन भागात विभागीकरण होतं. पहिला म्हणजे Section 80 C आणि दुसरा म्हणजे  Section 24 B. 

EMI वाढवण्यामुळे तुमचा कर्ज परताव्याचा काळ कमी होतो. आपल्या पगारातील अमुक एक भाग कर्ज फेडण्यासाठी जाणार हेसुद्धा आपण स्वीकारतो. तुम्ही या पर्यायाचा विचार करत असाल, तर दर वर्षी 10 टक्क्यांनी हे प्रमाण वाढवा. काही वर्षांनी व्याजाचत्या रुपात तुमचे जे पैसे वाचणार आहेत तिथे स्पष्टपणे दिसून येईल. 

दुसऱ्या पर्यायाविषयी म्हणजेच पार्ट पेमेंटविषयी सांगावं तर,  तुम्ही जे पैसे तुम्ही भरणार आहात ते प्रिन्सिपल आउटस्टँडिंगमधून कमी केले जातील. म्हणजेच व्याजदर कमी लागणार. 

तुम्ही होम लोन लवकरात लवकर फेडण्यासाठी पहिल्या आणि दुसऱ्या पर्यायाला एकत्रही आणू शकता. म्हणजे प्रत्येक वर्षी तुम्ही इएमाय टॉप अप करा, शिवाय तुमच्याकडे अमुक एक रक्कम जमा झाली, की तीसुद्धा पार्ट पेमेंट रुपात कर्ज परताव्यासाठी द्या. यामुळे दुपटीनं फायदा होऊ शकतो.