जेव्हा वाघ पाण्यात मस्ती करताना दिसतात, मन प्रसन्न करणारा Video

सोशल मीडियावर व्हायरल या व्हिडिओमध्ये वाघ पाण्यात पोहताना दिसत आहे.

Updated: Jul 31, 2021, 04:43 PM IST
जेव्हा वाघ पाण्यात मस्ती करताना दिसतात, मन प्रसन्न करणारा Video title=

मुंबई : प्राण्यांचे अनेक व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर शेअर केले जातात, जे लोकांना खूप आवडतात. नुकताच एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये अनेक वाघ पाण्याजवळ दिसत आहेत. हा व्हिडिओ IFS अधिकारी सुधा रमन यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. Tiger Bathing Viral Video

व्हिडिओमध्ये वाघ पाण्यात पोहताना दिसत आहे. तर इतर तीन वाघ त्याला पाण्याचा आनंद घेताना पाहत आहेत. व्हिडिओमध्ये वाघ खेळत असताना आणि एकमेकांचा पाठलाग करताना पाहू शकता. 

व्हिडिओ शेअर करताना सुधा रमण यांनी ट्विट केले आहे की, "वाघ पाहण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी उत्कृष्ट व्हिडिओ. मोठ्या मांजरींपैकी फक्त वाघ पाण्यात जास्त वेळ घालवणे पसंद करतात. जेव्हा वाघांचे संरक्षण केले जाते, तेव्हा पाणवठ्यांसह संपूर्ण परिदृश्य संरक्षित होते.