शोपियाँ : जम्मू- काश्मीरमधील शोपियाँ येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे. परंतु या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. हे सर्व दहशतवादी एका घरात लपून बसले होते. त्यातील एक दहशतवादी सुरक्षा दलाच्या तावडीत सापडला नाही. त्यासाठी सुरक्षा दलाकडून सर्च मोहीम अद्यापही सुरू आहे.
Jammu & Kashmir: Three terrorists killed in an encounter at Amshipora area of Shopian. Operation still in progress. (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/6RpE7qX7Xr
— ANI (@ANI) July 18, 2020
सांगण्यात येत आहे की, गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा दल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी रात्री उशिरा या भागात कार्यवाही सुरू केली. चकमक सुरू होण्यापूर्वी सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना शरण जाण्याची संधी दिली होती. परंतु त्यांनी शरण न जाता गोळीबार करण्यास सुरूवात केली.
दरम्याम, काश्मीरचे जिल्हे एकामागून एक दहशतवाद्यांपासून मुक्त होत असल्याचे सांगण्यात येत आहे. काश्मीरमध्ये दहशतवादी संघटना आपले अस्तित्व वाचवण्यासाठी मोठा लढा देत असून सुरक्षा दलाने यंदाच्या वर्षी १३७ दहशतवाद्यांचा खात्मा केला.