राईड तुटल्याने तिघांचा मृत्यू

१५ जण जखमी झाले असून ६ जणांची प्रकृती गंभीर

Updated: Jul 14, 2019, 08:15 PM IST
राईड तुटल्याने तिघांचा मृत्यू title=

अहमदाबाद : अहमदाबादमध्ये राईड तुटल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अहमदाबादमधील कांकरिया अम्यूजमेंट पार्कमध्ये ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत १५ जण जखमी झाले असून ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. 

राईट सुरु असताना अचानक राईट तुटली आणि खाली कोसळली. पोलमधील वेल्डिंग तुटल्याने दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ३० जण या राईडमध्ये होते. राईडच्या क्षमतेपेक्षा अधिक जण बसवल्याचे बोलले जात आहे. तसेच या राईडच्या दुरुस्तीकडे लक्ष न दिल्याचा आरोपही केला जात आहे.

सुट्टीचा दिवस असल्याने या पार्कमध्ये इतर दिवसांच्या तुलनेत अधिक गर्दी होती. मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.