नवी दिल्ली: दिल्लीच्या सरकारी रुग्णालयांतील तीन निवासी डॉक्टरांना कोरोना विषाणूची (COVID-19) लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, सर्वप्रथम सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयातील बालरुग्ण विभागात असणाऱ्या ३२ वर्षीय डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली. मंगळवारी त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल समोर आल्यानंतर ही बाब स्पष्ट झाली होती.
यानंतर आता सफदरगंज रुग्णालयात कामाला असणाऱ्या त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाल्याचे समजते. मात्र, त्यांची पुन्हा एकदा चाचणी करण्यात येणार आहे. तर कोरोनाची लागण झालेला तिसरा डॉक्टर दिल्लीच्या कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये आढळून आला. त्यामुळे आता दिल्लीतील यंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या आहेत.
Coronaviurs: 'भारतात अमेरिकेइतकी भयानक परिस्थिती उद्भवणार नाही'
दिल्लीच्या निझामुद्दीन परिसरातील मशिदीत आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक परिषदेत सहभागी झालेल्या अनेक लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती कालच समोर आली होती. देशात करोनामुळे झालेले १० मृत्यू आणि जवळपास ८० जणांना करोनाची झालेली लागण या प्रकरणाशी निगडीत आहे. या बैठकीत सहभागी झालेले ४५ रुग्ण मंगळवारी तेलंगणामध्ये आढळले.
Lockdown : आठव्या दिवशी देशात 'सन्नाटा ही सन्नाटा'
दिल्ली सरकारने आतापर्यंत मशिदीतून २,३६१ जणांना बाहेर काढले आहे. यापैकी ६१७ जणांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरित लोकांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी दिली.