लग्न ठरत नाहीए ? या मंदिरात घ्या दर्शन

लग्नाच्या ठिकाणी काहीतरी अडचणी येतायत ? मग या मंदिराविषयी जाणून घ्यायला हवं.

Updated: Dec 20, 2017, 08:42 AM IST
 लग्न ठरत नाहीए ? या मंदिरात घ्या दर्शन  title=

नवी दिल्ली : वय निघून चाललय तरीही लग्न ठरत नाहीए ? मुलगा भेटत नाही ? की मुलगी भेटत नाही ? साखरपूडा ठरता ठरता नात तुटत ? की लग्नाच्या ठिकाणी काहीतरी अडचणी येतायत ? मग या मंदिराविषयी जाणून घ्यायला हवं.

या मंदिराविषयीच्या बातम्या सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

युपीच्या लखीमपूरमधील खीरी जिल्ह्यात अस एक शिव मंदिर आहे जिथे पावसाळ्यात जलाभिषेक केल्याने अविवाहितांचे भाग्य बदलल्याचे बोलले जाते.

इथे दर्शन घेणाऱ्यांना मनासारखा पार्टनर मिळतो असाही समज आहे. त्यामूळे सोमवारी इथे भक्तांची भली मोठी रांग लागलेली असते.  न्यूज १८ हिंदी ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

कुठे आहे मंदिर ?

लखीमपूर जिल्हा मुख्यालयापासून साधारण ५५ किलोमीटर नॅशनल हायवे नंबर २४ वर येणाऱ्या मैंगलगज कस्बेपासून ६ किमी दक्षिण पश्चिममध्ये असणारा मढिया घाट शेजारच्या जिल्ह्यातही प्रसिद्ध आहे.

हजारो अविवाहीतांची लग्न

 या मंदिरातजवळच्या गोमती नदीत डुबकी घेतल्या कुष्ठ रोगी देखील ठिक होतात असे म्हटले जाते असा देखील समज आहे. मैगलगंजमध्ये राहणारे व्यापारी रोमी गुप्ता सांगतात, मंदिरात जलाभिषेक करुन हजारो अविवाहीतांची लग्न झाली आहेत. अनेकांची 'अपत्यप्राप्ती'ची मनोकामनाही पूर्ण झाली आहे.'

दर सोमवारी दर्शन 

मंदिरात दर्शन घेतल्यानंतर लग्न झाले. आता श्रावणातील प्रत्येक सोमवारी आम्ही इथे येतो असे सीबीगंज येथे राहणारा अनुराग सांगतो. 
 
(ही बातमी भाविकांच्या श्रद्धेवर आधारीत आहे, 24.taas.com याच्याशी सहमत असेलच असे नाही)