नाना पटोलेंनंतर आणखी एक भाजप खासदार बंडाच्या पवित्र्यात

नाना पटोले यांच्यानंतर आता दिल्लीचे भाजप खासदार डॉ. उदित राज यांनी सरकारवर टीका केली आहे.

Updated: Dec 19, 2017, 11:25 PM IST
नाना पटोलेंनंतर आणखी एक भाजप खासदार बंडाच्या पवित्र्यात  title=

नवी दिल्ली : नाना पटोले यांच्यानंतर आता दिल्लीचे भाजप खासदार डॉ. उदित राज यांनी सरकारवर टीका केली आहे. नोकरीतील आरक्षण धोक्यात आल्यामुळे २६ डिसेंबर रोजी ‘संविधान बचाव’ यात्रा काढणार असल्याचे उदित राज यांनी जाहीर केले. त्याशिवाय सुप्रीम कोर्ट जजेस दलित विरोधी असल्यामुळे जजेस नियुक्तींची पद्धत बदलण्याची गरज असल्याचेही उदित राज यांनी सांगितले.

सरकारी नोकऱ्या बंद केल्या जात आहेत. आऊट सोर्सिंग सुरु आहे, यामुळे आरक्षण मरत चाललं आहे. कंत्राटी आणि आऊट सोर्सिंग खूप घातक आहे. एससी, ओबीसी आणि महिलांचा हिस्सा मारला जातोय. आमचं सरकार असलं तरी चुकीच्या नितीचा विरोध करणार, असं मत उदित राज यांनी व्यक्त केलं आहे.

सरकारी कार्यालयात भरतीच्या नियमांचे पालन होत नसल्याचा आरोपही उदित राज यांनी केला आहे. तसंच २६ डिसेंबरला रामलीला मैदानात आंदोलन करणार असल्याचं उदित राज म्हणालेत. यापूर्वी स्वदेशी जागरण मंचानंही सरकारच्या नितीविरोधात प्रदर्शन केलं. आम्ही तर संविधानीक मुद्दा घेऊन आंदोलन करत आहोत, असं वक्तव्य उदित राज यांनी केलंय.