मध्य प्रदेश : पोटची भूक माणसाला शांत बसून देत नाही. तुम्ही किती दिवस उपाशी राहू शकता? एक- दोन दिवस. फारफारतर एक आठवडा. काहींना तर एका दिवसाचा उपवास झेपत नाही. पण पण मध्य प्रदेशच्या धामनोदमधील एक महिला चक्क ६० वर्षांपासून उपाशी आहे. आश्चर्य वाटले ना ? इतके वर्ष जर या महिलेले काही खाल्लेले नाही तर मी ती जिवंत कशी ? असा प्रश्न देखील मनात आला असेल.
या महिलेचे नाव सरस्वतीदेवी असून तिचे वय ७५ वर्षे आहे. मागील ६० वर्षांपासून तिने अन्न ग्रहण केलेले नाही. ती फक्त चहा पाण्यावरच जगते. विवाहानंतर पहिल्या बाळंपणात तिला टायफाईड झाला. या आजरात तिने काहीही खाल्ले तरी तिला उलटी होत असे. अनेक उपाय करूनही तिचा हा त्रास काही कमी झाला नाही. मग कंटाळून तिने औषध घेणे बंद केले. तेव्हापासून ही महिला उपाशी आहे.
या महिलेले पाच मुले आहेत. ‘दैनिक भास्कर’ने दिलेल्या वृत्तानुसार, केवळ चहा पाण्यावर जगणारी ही महिला शेतात ३ किलोमीटर अंतर चालत जात असे आणि ८ तास शेतात काम देखील करत असे. आता वयोमानानुसार तिने सर्व कामे करणे बंद केले असून ती घरीच असते.