ब्लू व्हेल गेमचे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्याने पहिल्या मजल्यावरून मारली उडी...

हावडा येथील नववीत शिकणारे तीन विदयार्थी ब्लु व्हेल गेम खेळत होते.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 13, 2017, 02:49 PM IST
ब्लू व्हेल गेमचे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्याने पहिल्या मजल्यावरून मारली उडी... title=

हावडा (पश्चिम बंगाल) : हावडा येथील नववीत शिकणारे तीन विदयार्थी ब्लु व्हेल गेम खेळत होते. त्यापैकी एकाने मंगळवारी शाळेच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचे प्राण वाचले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे तिघे बगनान येथील सरकारी उच्च विद्यालयातील नवव्या इयत्तेत शिकतात. 

शाळा सुटण्याच्या वेळेस शिक्षकांनी कोणीतरी पडण्याचा आवाज ऐकला आणि घटनास्थळी धाव घेतली असता एक विद्यार्थी जमिनीवर पडलेला दिसला. त्यावेळी दोन विद्यार्थी पहिल्या मजल्यावर उपस्थित होते. 

त्या विद्यार्थांनी सांगितले की ते ब्लु व्हेल गेम खेळत होते. त्यांनतर त्या विद्यार्थांना बगनान पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. मुलांचे कॉउंसिलिंग करून त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. आतापर्यंत ब्लु व्हेल गेममुळे अनेक मुलांनी आपले प्राण गमावले आहेत. अलीकडेच राजस्थानमध्ये एका मुलीने ब्‍लू व्‍हेल गेमचे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी आत्महत्या केली. तत्पूर्वी तिने सांगितले की, मी जर जीव नाही दिला तर माझ्या आईचा मृत्यू होईल.