घर बांधण्यासाठीचा असा जुगाड कधीही पाहिला नसेल... पाहून IPS अधिकारीही हैरान

सध्या सोशल मीडियावर असा एक फोटो व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

Updated: Mar 7, 2022, 04:19 PM IST
घर बांधण्यासाठीचा असा जुगाड कधीही पाहिला नसेल... पाहून IPS अधिकारीही हैरान title=
प्रतिकात्मक फोटो

मुंबई : आपल्याला तर हे माहित आहे की, जुगाडच्या बाबतीत भारतीय लोकांचा हात कोणीही धरु शकत नाही. आपल्याकडे लोकांना प्रत्येक गोष्टीत जुगाड करण्याची सवय आहे. त्यामुळे दररोजच्या वस्तुंपासून ते अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी जुगाड करतात. भारतीयांच्या जुगाडाची बरोबरी कोणीही करु शकत नाही. यासंदर्भात सोशल मीडियावर तुम्ही बरेच व्हिडीओ किंवा फोटो पाहिले असणार जे तुम्हाला आश्चर्यचकीत करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला धक्का बसेल.

हा फोटो एका घर बांधण्याच्या वेळेचा आहे. तुम्ही तसे बऱ्याचदा घर बांधताना पाहिलं असणार किंवा या संदर्भात व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिलं असणार, परंतु हा फोटो काहीसा वेगळा आहे. यामधील जुगाडाला कशाचीच तोड नाही असं तुम्ही म्हणाल.

घराच्या बांधकामादरम्यान कामगार सर्वात कठीण आणि कठोर परिश्रम करतात. कडक उन्हात आणि कडाक्याच्या थंडीत अनेक तास उभे राहून तो लोकांची घरे बांधतो. परंतु हा कामगार थोडासा वेगळा आहे. त्याने जास्त मेहनत न करता काम करण्यासाठी बुद्धीचा वापर केला आहे.

व्हायरल होत असलेला फोटो घराच्या बांधकामाचा आहे. एका घराच्या भिंतीला प्लास्टर करण्यासाठी मजूर ट्रॅक्टरची ट्रॉली क्रेनला टांगून त्या ट्रॉलीवर उभे राहून भिंतीचे प्लास्टर केल्याचे चित्र दिसत आहे. मजुरांचा हा जुगाड पाहून आयपीएस अधिकारी दीपांशु काबराही त्यांचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत.

आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. यासोबत त्यांनी एक मजेशीर कॅप्शन लिहिले आहे. त्यांनी लिहिले, 'इंडियन्स आर नो मॅच.' या फोटोला लोक जोरदार शेअर करत आहे.