मुंबई : डिजिटल करन्सी म्हणून सध्या आतरराष्ट्रीय मार्केटमध्ये बिटकॉईनने चांगलीच खळबळ उडवली आहे. पण, बिटकॉईनचे हे कौतूक फार काळ चालणार नाही असे दिसते. बिटकॉईनला आता लिटकॉइनने आव्हान दिले आहे. लिटकॉईनने वर्षभरात तब्बल 5700 टक्के परतावा दिला आहे.
लिटकॉईन हा बिटकॉईन, इथेरियम आणि बिटकॉइन कॅश नंतर जगभरातील सर्वात मोठी चौथी क्रिप्टोकरन्सी बनला आहे. Coingecko.com ने दिलेल्या आकडेवारीनुसार 0.88 लख कोटी रूपयांच्या माक्रेट कॅपिटायलाजेशनसोबतच लिटकॉईन 16,313 रूपयांच्या आसपास ट्रेड करत होता. आंतरराष्ट्रीय बाजारात लिटकॉईनची किंमत सुमारे 253 डॉलर इतकी आहे. वार्षीक कामगिरी पाहता 12 डिसेंबरपर्यंत लिटकॉईनने 5700 टक्क्यांची उसळी घेतली. लक्षवेधी असे की, या काळात बिटकॉईन समारे 1550 टक्क्यांनी मजबूत झाला.
आयओटीए आणि रिपलचे मार्केट कॅपिटलायजेशन अनुक्रमे: 0.75 लाख आणि 0.67 लाख कोटी रूपये आहे. दरम्यान, आयओटीए 270.59रूपये म्हणजेच रिपल 17.28 रूपयांच्या जवळपास ट्रेड करत होती. बिटकॉईन आणि इथेरियम नंतर आयओटीए तिसऱ्या पीढीतील ब्लॉकचेनचे प्रतिनिधित्व करते. ही कोणती साधी ब्लॉकचेन नाही. तर, पूर्णपणे नवा कॉन्सेप्ट आहे. स्टार ऑफ द इयर बिटकॉईन किंमत 10.73 लाख रूपयांजवळ पोहोचली आहे.