खोकल्याच्या आवाजवरुन समजेलं तुम्हाला कोरोना आहे का?

एआय (AI) अल्गोरिदमद्वारा रेकॉर्डिंमधून व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे की नाही याबाबत समजू शकेल.

Updated: Apr 18, 2020, 12:53 PM IST
खोकल्याच्या आवाजवरुन समजेलं तुम्हाला कोरोना आहे का? title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसबाबत समजण्यासाठी, त्यापासून वाचण्यासाठी जगभरातील अनेक संशोधक अनेक प्रकारची उपकरणं तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी संशोधकांकडून शेकडो पर्यांयाचं विश्लेषणही केलं जात आहे. पिट्सबर्गमध्ये कार्नेगी मेलन यूनिव्हर्सिटीतील प्राध्यापक रीता सिंह यांनी एक असं उपकरण बनवलं आहे जे व्यक्तीच्या खोकल्याच्या आवाजावरुन, त्याच्या बोलण्यावरुन, एवढंच नाही तर श्वास घेण्याच्या आवाजावरुनही कोरोना व्हायरस आहे की नाही याबाबत सांगू शकत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

संशोधक, रुग्णांचा आवाज आणि त्यांच्या खोकल्याच्या आवाजाची रेकॉर्डिंग करत आहेत. त्यानंतर एआय (AI) अल्गोरिदमद्वारा रेकॉर्डिंमधून व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे की नाही याबाबत समजू शकेल असं सांगण्यात आलय. कोविड-19 व्हॉईस डिटेक्टरबाबत बोलताना प्राध्यापक सिंह यांनी सांगितलं की, व्हॉईस डिटेक्टर व्यक्तीचा आवाज ऐकून त्यातील सामान्य डोळ्यांना न दिसणाऱ्या सूक्ष्म हालचाली ट्रेस करतं.

फुफ्फुस किंवा श्वसन तंत्राला प्रभावित करणाऱ्या कोणत्याही स्थितीचा, आवाजावर प्रभाव पडतो. हे उपकरण मूळ रुपात एक सेल्फ लर्निंग सिस्टम आहे, जे केवळ सामान्य खोकलाच नाही तर आवाजात असणाऱ्या कोरोना संसर्गालाही समझण्याचा प्रयत्न करतो, असं सांगितलं जातंय.

अशाचप्रकारचं उपकरण मुंबईतील वाधवानी इंन्स्टिट्यूट फॉर आर्टिफिशियल इंटेलिजेन्सद्वारा तयार करण्यात येत आहे. वाधवानी यांचं ‘cough against covid’ नावाचं मोबाईल ऍप यूजरला आपल्या खोकल्याचा आवाज रिकॉर्ड करण्यास सागतं. यातून कोरोना व्हायरसची टेस्ट होऊ शकत असल्याचं सांगण्यात येत आहे.

कोरोना व्हायरसने जगभरातील गदी मंदावली आहे. अशात संशोधक आणि आरोग्य विशेषज्ञ या माहामारीपासून बचाव होण्यासाठी टेक्नोलॉजीच्या मदतीने काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करत आहेत. 

एकीकडे संशोधक खोकल्याच्या आवाजावरुन संसर्गाचा शोध घेण्यावर काम करत आहेत. तर दुसरीकडे एका अभ्यासातून असं समोर आलं आहे की, जवळच्या संपर्कापासून वाचण्यासाठी दोन मीटरचं अंतर सुरक्षित असल्याचं सांगितलं जातंय, मात्र ते तितकंस  सुरक्षित नाही. एका अध्ययनातून असं सांगण्यात आलंय की, जर कोणी तुमच्या दिशेने तोंडावर हात, रुमाल न धरता खोकल्यास दोन मीटरचंही अंतर पुरेसं नाही.

कॅनडातील एका रुग्णालयात वायरोलॉजिस्टद्वारा करण्यात आलेल्या तपासात असं समोर आलं की, मानवी खोकलाचा वायु प्रवाह नैसर्गिकरित्या हंगामी फ्लूने संक्रमित होतो. अध्ययनानुसार, जर कोणी व्यक्ती कोणत्याही सुरक्षात्मक गोष्टीशिवाय काही मीटर अंतरावरुन खोकल्यास, तो खोकला समोरच्यापर्यंत पोहचतो. खोकल्याचे जवळपास 10 टक्के बारीक थेंब चार सेकंदानंतरही हवेतच राहतात. हे निष्कर्ष साथीच्या काळात सोशल डिस्टन्सिंगच्या निर्णयाला पूर्णपणे सिद्ध करतात.