Dry Day : शहरात 'या' 4 दिवस 'ड्राय डे' असणार, सरकारची घोषणा

उत्पादन शुल्क आयुक्त कार्यालयाने (Excise Commissioner Office) याबाबतचे आदेश काढले आहेत. 

Updated: Oct 6, 2022, 08:40 PM IST
Dry Day : शहरात 'या'  4 दिवस 'ड्राय डे' असणार, सरकारची घोषणा title=

Delhi Liquor Shop closed Dry Day : कोरोनानंतर यंदा पहिल्यांदाच निर्बंधाविना (Covid Restrictions) सण (Festival ) साजरे केले जात आहेत. गणेशोत्सव आणि नवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानंतर आता दिवाळी मोठ्या धुमधडाक्यात साजरी होणार आहे. त्याआधी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. (this 4 days liquor shop is closed in delhi city 2022 years know details)

ऑक्टोबर महिन्यातील उर्वरित दिवसांपैकी एकूण 2 दिवस वाईन शॉप बंद राहणार आहेत. साध्यासोप्या भाषेत सांगायचं झालं तर ऑक्टोबरमध्ये 2 आणि नोव्हेंबरमध्ये 2 असे एकूण 4 दिवस 'ड्राय डे' (Dry Day) असणार आहे.  दिल्ली सरकारने हा निर्णय घेतला आहे. उत्पादन शुल्क आयुक्त कार्यालयाने याबाबतचे आदेश काढले आहेत. 

कधी असणार ड्राय डे? 

ऑक्टोबर महिन्यात 9 आणि 24 तारखेला ड्राय डे असणार आहे. तर नोव्हेंबर महिन्यात 8 आणि 24 तारखेला दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उत्पादन शुल्क आयुक्तांच्या आदेशानुसार 9 ऑक्टोबरला मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस आणि  महर्ष‍ी वाल्‍मिकी यांची जयंती आहे.  24 ऑक्टोबरला दिवाळी आहे. तसेच नोव्हेंबरमध्ये 8 तारखेला गुरुनानक जयंती आणि 24 ला गुरु तेगबहादूर शहीद दिन आहे. 

ड्राय डे का असतो?

ड्राय डे घोषित करण्यामागे अनेक कारणे आहेत. वास्तविक, राष्ट्रीय सण आणि धार्मिक सणांशी संबंधित प्रसंगी ड्राय डे पाळला जातो. राष्ट्रीय सण, सैनिक, हुतात्मा, स्वातंत्र्यसैनिक यांच्या सन्मानार्थ तसेच सणांच्या दिवशी दारूची दुकाने बंद असतात. याशिवाय काही वेळा कायदा व सुव्यवस्थेमुळे शहरात किंवा राज्यात ड्राय डे जाहीर केला जातो. तसेच एखाद्या भागात निवडणुका झाल्या की त्या भागात ड्राय डे जाहीर करून कायदा आणि सुव्यवस्थेबाबत हा निर्णय घेतला जातो.