कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, या राज्यात इतकी मुले कोरोना पॉझिटिव्ह

 कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर संपत नाही. त्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. 

Updated: May 22, 2021, 10:48 PM IST
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, या राज्यात इतकी मुले कोरोना पॉझिटिव्ह title=

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर संपत नाही. त्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. कारण मुलांमध्ये देखीला आता कोरोनाचा संसर्ग होऊ लागला आहे. राजस्थानमधील दौसामध्ये असेच काहीसे चित्र आहे. कोरोनाच्या तिसऱ्य़ा लाटेचा धोका निर्माण झाला आहे. दौसामध्ये 341 मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तिसर्‍या लाटेची शक्यता पाहता दौसा जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.

दौसामध्ये तिसऱ्या लाटेचे आगमन होण्याचे संकेत आहेत. येथे 341 मुलांना संसर्ग झाला आहे. ही मुले 0 ते 18 वर्षे वयोगटातील आहेत. दौसामध्ये 1 मे ते 21 मे दरम्यान 341 मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. जिल्ह्याचे डीएम म्हणाले की, 341 मुले संक्रमित आहेत, परंतु त्यापैकी कोणीही गंभीर नाही. आतापर्यंत, कोविडच्या तिसर्‍या लाटेची शक्यता लक्षात घेता दौसा जिल्हा रुग्णालयाला सतर्क केले गेले आहे.'

राजस्थानच्या ग्रामीण भागात कोरोना रोखण्यासाठी राजस्थान सरकारने आता तयारी सुरू केली आहे. आरोग्य विभागाची टीम गावोगावी आणि घरोघरी फिरुन लोकांची कोविड टेस्ट करणार आहे. गावातच कोविड सेंटर बांधले जाईल आणि रूग्णांवर उपचार सुरू केले जातील. डोर-टू-डोर सर्वेक्षण अभियान सुरू केले गेले आहे.

विशेष म्हणजे तिसरी लहर येण्यापूर्वीच मुलांमध्ये कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. महाराष्ट्र, कर्नाटकसारख्या राज्यात दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग झपाट्याने झाला. तज्ञांचा अंदाज आहे की तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक ठरू शकते.

एका आकडेवारीनुसार, 9 मार्च ते 25 सप्टेंबर 2020 दरम्यान कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान 10 वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये 19,378 जणं आणि 11 ते 20 वर्षे वयोगटातील 41,985 मुले पॉझिटिव्ह आली होती. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत फक्त 15 दिवसांच्या दरम्यान म्हणजे 1 मे ते 16 मे 2021 पर्यंत 19 हजार मुले कोरोना पॉझिटिव्ह आली होती.

आरोग्य तज्ञांच्या मते, कोरोना झालेल्या मुलांना सौम्य ताप, खोकला, सर्दी, श्वास घेण्यात अडचण, अतिसार, अन्नाची चव नसणे, गंध न येणे. थकवा येणे, घसा खवखवणे, स्नायू वेदना असा त्रास होऊ शकतो.