लॅपटॉप चोरण्यासाठी कॅफेमध्ये घुसला खरा... पण खरा 'गेम' तर चोराचाच झाला, पाहा व्हिडीओ

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला कॉफी शॉपमध्ये बसली आहे. तेव्हा एक हेल्मेट घातलेला व्यक्ती तेथे येतो

Updated: Mar 16, 2022, 05:05 PM IST
लॅपटॉप चोरण्यासाठी कॅफेमध्ये घुसला खरा... पण खरा 'गेम' तर चोराचाच झाला, पाहा व्हिडीओ title=

मुंबई : बऱ्याच लोकांसोबत असा प्रकार घडला आहे की, त्यांच्या आयुष्यात एकदातरी चोरी झालेली पाहिली असेल. चोरी करणारे भामटे हे आपली हातचलाखी करतात, ज्यामुळे ते कोणाच्याही पुढ्यातील वस्तु किंवा पैसे असे काही उचलतात की त्याचा कोणाला थांग पत्ता लागत नाही. त्यात काही चोरटे तर लोकांच्या समरुन धाक दाखवून वस्तु चोरुन घेऊन जातात. आता असाच एक चोकरीचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला कळेल की, या चोराने कशी चोरी केली. परंतु त्याने ज्या महिलेच्या हातातून वस्तु हिस्कावून घेतली, ती महिला खूपच सतर्क होती. ज्यामुळे चोराला ती वस्तु चोरने शक्य झालं नाही.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला कॉफी शॉपमध्ये बसली आहे. तेव्हा एक हेल्मेट घातलेला व्यक्ती तेथे येतो आणि त्या महिलेच्या पुढ्यातील लॅपलॉप घेऊन पळतो. परंतु तेवढ्या ही महिला सतर्क होते आणि तो लॅपलॉपला एक वायर लावलेली असले, त्या वायरने तो पुन्हा खेचते. ज्यामुळे या महिलेला लॅपटॉप पुन्हा मिळतो आणि तो चोरीला जाण्यापासून वाचतो.

या चोराने तो लॅपटॉप नीट पकडला नव्हता, ज्यामुळे या महिलेनं वायर खेचताच, त्याच्या हातातून तो निसटला. ज्यामुळे या महिलेला तिचा तिचा लॅपटॉप परत मिळाला. 

यादरम्यान कॅफेमध्ये उपस्थित असलेले सर्वजण सावध झाले आणि त्यांनी चोरावर हल्ला करण्यासाठी खुर्ची उचलली. ज्यामुळे शेवटी चोराला तेथून पळ काढावा लागला.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेला व्हिडिओ लोक मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. हा व्हिडिओ @ViciousVideos ने ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ 38 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.