नवी दिल्ली : कोरोना वायरसच्या प्रादुर्भावामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. जगभरात या वायरसची दहशत पसरली आहे. कोरोना वायरस आता पहिल्यापेक्षाही अधिक घातक होताना दिसतोय. कोरोना वायरसच्या विळख्यात मोठे-वयस्कर तसेच प्रत्येक वयातील माणसांना होतोय. तरुण किंवा वयस्करांमध्ये कोरोनाचा शिरकाव अधिक होतोय पण लहान मुलांमध्ये हे प्रमाण फारसे दिसत नाही. यासंदर्भात वैज्ञानिकांनी संशोधन केलंय.
ज्यामुळे फुफ्फुसातील पेशींवर कोरोना विषाणूचा परिणाम होतो. पण मुलांमध्ये रिसेप्टर प्रोटीनचा स्तर कमी असतो. त्यामुळे मोठे आणि वयस्करांच्या तुलनेत लहान मुलं वायरसचा शिकार होण्यापासून वाचतात.
रिसेप्टर प्रोटीनवर वैज्ञानिकांनी एक संशोधन प्रकाशित केलंय. कोरोना वायरसयुक्त कण फुफ्फुसात गेल्यानंतर प्रोटीन 'स्पाइक्स' ACE2 शी जोडले जाते. ज्यामध्ये फुफ्फुसांच्या काही पेशींच्या पृष्ठभागावर उपस्थित असलेल्या प्रथिने पेशीचा नाश होतो. अशा पद्धतीने कोरोना वायरस मानवी शरीराच्या आत प्रवेश करतो आणि हळुहळू जीवघेणा वायरस शरीरावर ताबा मिळवतो.
(SARS-CoV-2)शरीरातील पेशींशी संबंधित असतात. यानंतर वायरस पेशींवर अटॅक करण्यास यशस्वी होतो. ब्रिस्टल विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी याबद्दल माहिती दिली.
पेशींमध्ये विषाणूची अनुवांशिक सामग्री सोडल्यानंतर, विषाणूची संख्या वाढू लागते. 'आम्ही आमचे संशोधन फुफ्फुसांचा विकास समजून घेण्यावर केंद्रित केले आहे. कोविड १९ च्या विळख्यामध्ये आल्यानंतर तो वयस्कारांना कशाप्रकारे आपली शिकार बनवतो यावर संशोधन केल्याचे वैज्ञानिकांनी सांगितले.