मुंबई : या शतकातील सर्वात मोठे चंद्र ग्रहण शुक्रवारी रात्री दिसणार आहे. चंद्रग्रहण 2018 मध्ये चंद्र पृथ्वीच्या सावलीत जवळपास 1 तास 43 मिनिटे असणार आहे. हा कालावधी पूर्ण चंद्रग्रहणाचा असून चंद्रग्रहण 6 तासाचे असणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतात दिसणार आहे. भारतात हे चंद्रग्रहण रात्री 11.44 वाजता दिसायला सुरूवात होणार आहे.
हे चंद्रग्रहण 28 जुलै सकाळी 1 वाजता सुरू होणार आहे. चंद्र रात्री 1.15 वाजता पृथ्वीच्या सावलीत जाणार असून त्याची ही स्थिती 2.43 पर्यंत असणार आहे. या दरम्यान चंद्र पूर्णपणे लाल रंगाचा असणार आहे. ज्याला ब्लड मून असे म्हटले जाते. हे चंद्रग्रहण 27 जुलै नंतर 9 जून 2123 मध्ये अशाप्रकारचे मोठे चंद्रग्रहण दिसणार आहे.
या चंद्रग्रहणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ग्रहणाच्यावेळी चंद्रबिंबाच्या दक्षिणेस सात अंशावर मंगळ ग्रह दिसणार आहे. २७ जुलै रोजीच मंगळाची प्रतियुती होणार असून मंगळ ग्रह ३१ जुलै रोजी पृथ्वीच्या जवळ ५ कोटी ७५ लक्ष कि. मीटर अंतरावर येणार आहे. सध्या आपल्याइथे पावसाळा असल्याने आकाश अभ्राच्छादित राहते. परंतु ज्या ठिकाणी आकाश निरभ्र असेल तेथून खग्रास चंद्रग्रहण व मंगळ दर्शनाचा लाभ घेता येईल.