पवार-किशोर यांच्यातील हाय व्होल्टेज बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची शक्यता, वाचा सविस्तर

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. निवडणुकांचे रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्यासोबत आज त्यांची दिल्लीतील निवासस्थानी बैठक झाली.

Updated: Jun 21, 2021, 03:21 PM IST
पवार-किशोर यांच्यातील हाय व्होल्टेज बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची शक्यता, वाचा सविस्तर title=

नवी दिल्ली : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. निवडणुकांचे रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्यासोबत आज त्यांची दिल्लीतील निवासस्थानी बैठक झाली.

पवार आणि किशोर यांच्यात झालेल्या बैठकीमुळे राजकीय तर्क वितर्कांना उधान आले आहे. या भेटीबाबत राजकीय जाणकारांनी पुढील शक्यता वर्तवल्या आहेत.
1. भाजपला केंद्रीय सत्तेपासून रोखण्यासाठी रणनीति
2. येत्या 2024 च्या लोकसभा निवडणूकांच्या तयारीबाबत चर्चा
3. युपीए अध्यक्षपद शरद पवारांना देण्याबाबत चर्चा
4. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधून पवारांचा चेहरा पुढे करण्यावर चर्चा
5. भाजपविरोधात युपीएला मजबूत करण्यावर चर्चा

गेल्या आठवड्यात प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यात बैठक झाली होती. प्रशांत किशोर शरद पवार यांना भेटायला मुंबईत आले होते. शरद पवार यांच्या कार्यालयाकडून ही औपचारीक भेट असल्याचे सांगितले गेले होते. दोघांनी सोबत स्नेहभोजनही केल्याची माहिती समोर आली होती.

2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देण्याची तयारी
प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यात सुरू असलेल्या गुप्त बैठकीबाबत अनेक राजकीय चर्चांना उधान आले आहे. 2024 साली पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना आव्हान देण्यासाठी विरोधी पक्षांची स्ट्रटेजी काय असावी. याबाबत बैठकीत चर्चा सुरू असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना विजय मिळाला त्यात प्रशांत किशोर यांच्या रणनीतिचा मोठा वाटा होता. त्यांनी भाजपचे रणनीतिकार अमित शहा यांच्या विजयाच्या महत्वकांशा धुळीस मिळवल्या असे राजकीय जाणकार म्हणतात. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट महत्वाची मानली जात आहे.