आसाम रायफल्सवर दहशतवाद्यांचा हल्ला, अधिकाऱ्याच्या कुटुंबासह 4 जवान शहीद

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात अधिकारी आणि त्यांच्या पत्नी-8 वर्षांच्या मुलासह 4 जवान शहीद

Updated: Nov 13, 2021, 04:47 PM IST
आसाम रायफल्सवर दहशतवाद्यांचा हल्ला, अधिकाऱ्याच्या कुटुंबासह 4 जवान शहीद title=

इंफाळ: दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये अधिकाऱ्यासह त्याचं कुटुंबही शहीद झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अधिकाऱ्याच्या कुटुंबासह 7 जण शहीद झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मणिपूरमध्ये दहशतवाद्यांनी आसाम रायफल्सच्या तुकडीवर हल्ला केला. या हल्ल्यात आसाम रायफल्सचे सीओ, त्यांचा मुलगा आणि पत्नीसह ७ जण शहीद झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार चूडाचांदपूर जिल्ह्यात आसाम रायफल्सच्या 46 व्या तुकडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या तुकडीचं नेतृत्व कमांडिंग ऑफिसर कर्नल विप्लव त्रिपाठी करत होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि 8 वर्षांचा मुलगा देखील होता. दहशतवाद्यांनी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. 

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात विप्लव त्रिपाठी, त्यांची पत्नी आणि मुलासह 4 जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्वीट करून कमांडिंग ऑफिसर विप्लव त्रिपाठी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर देऊ, हल्लेखोरांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे.