या मंदिरात जातच भक्त होतात मालामाल! प्रसाद म्हणून मिळतात सोने-चांदीची दागिने

महालक्ष्मी देवीचे असे विशेष मंदिर तुम्ही पाहिलंय का जेथे प्रसाद म्हणून लाडू किंवा इतर खाद्य नव्हे तर, सोने चांदीचे दागिने दिले जातात. 

Updated: Nov 13, 2021, 04:13 PM IST
या मंदिरात जातच भक्त होतात मालामाल! प्रसाद म्हणून मिळतात सोने-चांदीची दागिने title=

मुंबई : महालक्ष्मी देवीचे असे विशेष मंदिर तुम्ही पाहिलंय का जेथे प्रसाद म्हणून लाडू किंवा इतर खाद्य नव्हे तर, सोने चांदीचे दागिने दिले जातात. भारतात लाखो मंदिरे आहेत. यातील बऱ्याच मंदिरांमध्ये विविधता आहे. काही मंदिरांची आपली वेगळी ओळख आहे. असेच एक मंदिर म्हणजेच मध्यप्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील महालक्ष्मी मंदिर होय. 

महालक्ष्मी मंदिर रतलाम जिल्ह्यातील माणकमध्ये स्थित आहे. येथील मंदिर वेगळ्याच कारणामुळे प्रसिद्ध आहे. येथे भक्तांना प्रसाद स्वरूपात लाडू आणि अन्य खाद्यपदार्थ मिळत नाही तर, सोन्या चांदीचे दागिने दिले जातात. येथे येणारे भक्त मालामाल होऊन परत जातात. 

महालक्ष्मी देवीचे मंदिर
मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भक्ताला येथे प्रसाद स्वरूपात सोने-चांदीची नाणी आणि दागिने दिले जातात. येथे भक्तांची नेहमीच गर्दी असते. मंदिराप्रती भक्तांची मोठी श्रद्धा आहे.

महालक्ष्मीचे लाखो भक्त मंदिरात कोट्यावधींचे दागिने दान करतात. त्याशिवाय रोख देखील दान केले जाते. 

दिवाळीच्यानिमित्ताने या मंदिरात कुबेराचा दरबार लागतो. या दरम्यान धनत्रयोदशीपासून पाच दिवसांपर्यंत मंदिरात दीपोत्सवाचे आयोजन केले जाते.

मंदिराला फुलांनी नाही तर, पैसे आणि दागिन्यांनी सजवले जाते. कुबेराच्या दरबारात भक्तांना प्रसादाच्या स्वरूपात सोने-चांदेचे दागिने आणि रुपये दिले जातात.

दिवाळीच्या दिवसांमध्ये मंदिराचे कपाट 24 तास खुले राहतात. धनतेरसच्या दिवसांमध्ये येथून कोणताही भक्त रिकाम्या हाती परतत नाही.

पुरातन काळापासून देवीला दागिने चढवण्याची परंपरा आजही टिकून आहे. तसेच देवीची कृपा देखील भक्तांवर अखंड राहते..