पुन्हा पडली ठिणगी! आंदोलनकर्त्या काश्मिरी पंडितांवर पोलिसांचा लाठीचार्ज

भय इथले संपत नाही...काश्मीरमधील धगधगतं वास्तव पुन्हा समोर... या वेळी रुपेरी पडद्यानं नव्हे तर प्रत्यक्ष दृश्यांनी विचलित केलं... पाहा व्हिडीओ

Updated: May 13, 2022, 12:34 PM IST
पुन्हा पडली ठिणगी! आंदोलनकर्त्या काश्मिरी पंडितांवर पोलिसांचा लाठीचार्ज title=

जम्मू-काश्मीर : द काश्मीर फाईल्स सिनेमातील दाखवलेली दृश्यं अंगावर काटा आणणारी आहेतच. पण काश्मीरमधील धगधगणाऱ्या वास्तवाला पुन्हा एकदा वाचा फोडणारा आहे. रुपेरी पडद्यावरच नाही प्रत्यक्षात घडलेली ही दृश्य अंगावर काटा आणणारी आहेत.

काश्मिरी पंडितांना आजही आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरावं लागतं. पोलिसांच्या लाठ्या खाव्या लागत आहेत. आजही काश्मीरमध्ये भयंकर स्थिती असल्याचं काही व्हिडीओमधून समोर आलं. आंदोलन करणाऱ्या काश्मिरी पंडितांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. 

गुरुवारी दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित राहुल भट्टची तहसिल कार्यालयात घुसून हत्या केली. त्यानंतर बडगाममध्ये काश्मिरी पंडितांनी आंदोलन केलं. संतप्त आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रू धुराचा वापर करावा लागला. 

या घटनेनंतर काश्मिरी पंडितांनी पुन्हा एकदा आक्रोश केला आहे. आजही काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित सुरक्षित नाहीत असंच या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आलं आहे. 

पुलवामा इथे आजही दहशतवाद्यांनी घरात घुसून SPO वर गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर लोकांमध्ये खूप मोठा आक्रोश आहे. राहुल भट्टच्या हत्येविरोधात भाजनेही आंदोलन केलं. 

तहसिल कार्यालयात 100 हून अधिक लोक असताना फक्त राहुलची हत्याच का झाली? या हत्येमागे नेमकं काय कारण? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अद्याप मिळणं बाकी आहे.