पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट रचणाऱ्याला फाशीची शिक्षा

मुळचा महाराष्ट्रातील औरंगाबादचा राहणारा

Updated: Dec 16, 2018, 02:11 PM IST
पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट रचणाऱ्याला फाशीची शिक्षा title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या लश्कर-ए-तैयबाचा दहशतवादी अब्दुल नईम उर्फ शेख समीर याला शनिवारी बनगाव कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. शेख समीरला मंगळवारी कोर्टाने दोषी ठरवलं होतं. पण शनिवार त्याला शिक्षा सुनावण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर शेख समीरने न्यायाधीश विनय कुमार पाठक यांच्यासमोर आपण निर्दोष असल्याचं म्हटलं.

शेख समीर लश्कर-ए-तैयबाचा सक्रिय सदस्य होता. एप्रिल 2007 मध्ये पेट्रापोल सीमाजवळ एका घरातून 3 जणांसब जवानांनी त्याला पकडलं होतं. मोहम्मद यूनुस, शेख अब्दुल्ला आणि मुजफ्फर अहमद राठौड अशी इतरांची नावे आहेत. सीआयडीने त्यांच्याविरोधात देशाच्या विरुद्ध कारवाई, हत्यार गोळा करणे अशा वेगवेगळ्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. शेख समीर मूळचा महाराष्ट्राच्या औरंगाबादचा राहणारा आहे.

सॉफ्टेवयर इंजीनियर समीर 2005 मध्ये सऊदी अरबला गेला होता. त्याने तेथे लश्कर-ए-तैयबाचा एजेंट अहमदची भेट घेतली. शेख समीर तेथून पाकिस्तानला गेला. तेथे त्याने दहशतादी प्रशिक्षण घेतलं. काश्मीरमध्ये भारतीय सीमेवर कडेकोट बंदोबस्त असल्याने तो भारतात घुसखोरी नाही करु शकला. त्यामुळे तो बांग्लादेशला गेला. त्यानंतर त्याने सीमेजवळील एका गावात घर घेतलं. त्यावेळी भारतीय जवानांनी त्यांचा ताब्यात घेतलं. 2012 मध्ये त्याच्यावर कोर्टात सुनावणी सुरु झाली.

2014 मध्ये त्याला मुंबईला आणलं जात असताना तो ट्रेनमधून पळून गेला. त्यानंतर 2017 मध्ये त्याला दिल्लीमध्ये अटक करण्यात आली. त्याच्यावर पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट रचल्याचा देखील आरोप आहे. यानंतर शेख समीरला तिहाड जेलमध्ये पाठवण्यात आलं. दोषी ठरल्यानंतर कोर्टाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे.