पटना : जेडीयू प्रमुख लालू प्रसाद यादव आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांचा मुलगा तेजप्रताप यांच्या घटस्फोटाच्या अर्जावरील सुनावणीचा काऊंडाऊन सुरू झालायं. या अर्जावरील सुनावणी आज आहे. काही दिवसांपुर्वी तेज प्रतापने पत्नी ऐश्वर्यावर खळबळजनक आरोप केले होते. असं असलं तरीही ऐश्वर्या आणि तिच्या आई-वडीलांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ऐश्वर्या आज आपली बाजू न्यायालयात मांडणार आहे.
हनीमूनवरुन तेजप्रताप आणि ऐश्वर्याचा वाद झाल्याची चर्चा आहे. लोकल मीडियाच्या रिपोर्टसनुसार तेजप्रताप यादव यांनी म्हटलं की, त्यांची आणि पत्नीमध्ये हनीमूनवरुनच वाद सुरु झाला होता. ऐश्वर्याला हनीमूनसाठी इंडोनेशियाला जायचं होतं. पण त्यासाठी नकार दिल्याने हा वाद सुरु झाला.
ते एक धार्मिक व्यक्ती असल्याने अशा जागेवर जाणं शोभत नाही. ऐवढंच नाही तर तेजप्रतापने ऐश्वर्यावर आरोप केले आहेत की, आधुनिक विचारांच्या ऐश्वर्याला सिगरेट आणि ड्रिंक करण्याचा देखील शौक आहे.
तेजप्रताप यांनी म्हटलं की, ते आता संसाराची गाडी पुढे नाही नेऊ शकत. हा विवाह राजकीय फायद्यासाठी केल्याचा आरोप देखील तेजप्रताप यांनी केला आहे. आपला या लग्नाला विरोध होता पण घरच्या व्यक्तींनी त्य़ांचं ऐकलं नाही आणि जबरदस्ती त्यांचा विवाह करुन दिला.
12 मे ला पटनामध्ये दोघांचं धुमधडाक्यात त्यांचं लग्न झालं होतं.
यावेळी मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. या लग्नासाठी लालूंना पॅरोल देखील देण्यात आला होता.
ऐश्वर्या राजकारणात येणार असल्याच्या बातम्याही काही दिवसांपूर्वी आल्या होत्या.