कामाची बातमी! तुमच्या Aadhaar Card चा गैरवापर तर होत नाहीए ना? घर बसल्या असं तपासा

तुमच्या आधार कार्डशी किती मोबाईल नंबर लिंक आहेत, अशा प्रकारे तपासा

Updated: Aug 18, 2022, 07:21 PM IST
कामाची बातमी! तुमच्या Aadhaar Card चा गैरवापर तर होत नाहीए ना? घर बसल्या असं तपासा title=

Technology News : Aadhaar Card शी Mobile Number लिंक केला जातो हे आपल्या सर्वांना माहित आहे. पण एक पेक्षा जास्त मोबाईल नंबरही आधार कार्डशी लिंक करता येतात. आता तुम्ही विचार कराल की एकापेक्षा जास्त मोबाईल नंबर कसे रजिस्टर होऊ शकतात. पण तुम्हाला हे माहित असणं गरजेचं आहे की, दूरसंचार विभागाच्या ( Department of Telecommunications) मार्गदर्शक सूचनांनुसार (guidelines) एक व्यक्ती आपल्या आधार कार्डशी 9 मोबाईल नंबर लिंक करु शकतो.

पण आपल्या आधारकार्डशी किती मोबाईल नंबर लिंक आहेत हे तुम्ही सहज तपासू शकता. दूरसंचार विभागाने यासाठी एक पोर्टल (Portal) तयार केलं असून याद्वारे तुम्ही आपल्या आधार कार्डची माहिती तपासू शकता.

पोर्टल कसं काम करतं?
टेलीकॉम अॅनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट आणि कंझ्युमर प्रोटेक्शन पोर्टलवर लोकांना त्यांच्या आधार क्रमांकाशी किती मोबाइल नंबर लिंक आहेत हे तपासण्याची सुविधा उपलब्ध आहे.

- सर्वा आधी AFCOP पोर्टल https://tafcop.dgtelecom.gov.in/index.php लॉग इन करा
- त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करा
- मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओटीपी बटनवर क्लिक करा
- तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल, तो OTP साईटवर रजिस्टर करा
- OTP टाकताच तुमच्या आधार कार्डशी किती मोबाईल नंबर लिंग आहेत याची माहिती उपलब्ध होईल
-  लिंक केलेल्यापैकी जे तुमचे नंबर नाहीत त्याचा रिपोर्ट करण्याचा ऑप्शनही उपलब्ध आहे

नोट - वरती दिलेली सुविधा सध्या आंध्रप्रदेश, तेलंगना,राजस्थान आणि जम्मू काश्मीर राज्यात उपलब्ध आहे