उत्तर प्रदेश : शाळा हे विद्येचे मंदिर आहे. तिथे अनेक चांगल्या गोष्टी, जीवनावश्यक मुल्ये शिकवली जातात. देशभक्ती जागृत केली जाते. राष्ट्रगीत, वंदे मातरम् हा तर दैनंदिन जीवनाचा भाग होऊन जातो. पण अशी ही एक शाळा आहे जिथे वंदे मातरम् आणि भारतमाता की जय बोलल्यावर विद्यार्थ्यांना मारले जाते.
ही धक्कादायक घटना कोणत्या इतर देशात नाही तर चक्क भारतात घडली आहे. उत्तर प्रदेशातील मिर्जापूर येथे हा प्रकार घडला. जाफरखानी प्राथमिक विद्यालय असे या शाळेचे नाव आहे.
या घटनेची तक्रार शिक्षक अधिकाऱ्यांना करण्यात आली.
या शाळेत पहिली ते पाचवी इयत्तेत एकूण 140 विद्यार्थी शिकतात. या मुलांनी तक्रार केली आहे की, वंदे मातरम् आणि भारतमाता की जय बोलल्यावर शिक्षक मारतात. दोन विद्यार्थ्यांचे डोके एकमेकांना आपटतात.त्याचबरोबर वंदे मातरम् आणि भारतमाता की जय बोलण्यास मनाई करतात.
हे प्रकरण आता जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी प्रविण कुमार तिवारी यांच्याकडे पोहचले आहे. त्यांनी या प्रकरणी शिक्षक शाहिद फैजल यांना निलंबित केले आहे. त्याचबरोबर उपजिल्हाधिकारी डॉ. अविनाश त्रिपाठी यांनी शाळेला भेट दिली आणि शिक्षक व विद्यार्थ्यांनी संवाद साधला.