विशाखापट्टनम : आंध्र प्रदेशमध्ये नक्षलवाद्यांनी तेलगु देशम पार्टी (टीडीपी) च्या आमदार आणि एका माजी आमदाराची हत्या केली आहे. नक्षलवाद्यांनी गोळी मारुन त्यांची हत्या केली आहे. ANI च्या माहितीनुसार नक्षलवाद्यांनी विशाखापट्टनम जिल्ह्यातील अराकू घाटी येथे दोन्ही नेत्यांची हत्या केली आहे. आमदार सर्वेश्वर राव वायएसआरसीपी पक्षातून टीडीपीमध्ये गेले होते. तर श्रीवेरी सोमा हे माजी आमदार होते. दोन्ही नेत्यांना गोळ्या मारुन त्यांची हत्या केली गेली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी अनेकदा त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. नक्षलवाद्यांनी राव यांच्या पर्सनल असिस्टंटची देखील हत्या केली आहे.
We're trying to ascertain facts from the PSOs. As per preliminary information, 20 Maoists were there with weapons & there may be some more in the neighbouring vicinity & they came along with the villagers:Visakhapatnam DIG Srikanth on Kidari Sarveswara Rao & Siveri Soma shot dead pic.twitter.com/6y5ZHzqHTL
— ANI (@ANI) September 23, 2018