TCS, Infosys, Wipro, HCL या कंपन्यांमधिल कर्मचाऱ्यांना झटका, 2022 पर्यंत 30 लाख कर्मचाऱ्यांची नोकरी संकटात?

 देशांतर्गत सॉफ्टवेयर कंपन्यांमध्ये सध्या 1.6 कोटी कर्मचारी काम करत आहेत.

Updated: Jun 18, 2021, 08:12 AM IST
TCS, Infosys, Wipro, HCL या कंपन्यांमधिल कर्मचाऱ्यांना झटका, 2022 पर्यंत 30 लाख कर्मचाऱ्यांची नोकरी संकटात? title=

मुंबई : टेक्नोलॉजी इंडस्ट्रीमध्ये ऑटेमेशने जोर धरला आहे. ही गोष्ट आपल्यासाठी जितकी चांगली आहे तितकीच वाईट सुद्धा चांगली यासाठी की, आपला देश यामुळे प्रगतीच्या दिशेने जात आहे.
ऑटोमेशनमुळे काही कामे वेळेत आणि जलद गतीने पूर्ण होतात. ज्याचा फायदा तर आपल्याला आहेच. परंतु या ऑटोमेशनचा एक वाईट परिणाम असा की, यामुळे अनेक लोकांचे जॉब जाणार आहेत. कारण आता माणसांना रिप्लेस करायला या सगळ्या ऑटेमॅटीक माशिन्स आल्या आहेत. या मशिन्सना फक्त सेट कराव्या लागतात, त्यानंतर त्या स्वत:हून आपले काम करतात. तसेच यांना पगारही देण्याची गरज भासत नाही ज्यामुळे अनेक कंपन्या ऑटोमेशनकडे वळत आहेत.

एका रिपोर्टमध्ये असा दावा केला आहे की, देशांतर्गत सॉफ्टवेयर कंपन्यांमध्ये सध्या 1.6 कोटी कर्मचारी काम करत आहेत. परंतु त्यांपैकी 30 लाख लोकं कमी करण्याचा निर्णय काही कंपन्यांनी घेतला आहे. ज्यामुळे 100 बिलियन डॉलर वाचणार आहेत. जी खरोखरच खूप मोठी रक्कम आहे.

Nasscom च्या अहवालानुसार, देशांतर्गत आयटी क्षेत्रात सुमारे 1.6 कोटी लोकं काम करतात, त्यातील सुमारे 90 लाख लोकं लो-स्किल्ड आणि बीपीओमध्ये काम करतात. या 90 लाख  लो-स्किल्ड सेवा आणि बीपीओपैकी 2022 पर्यंत 30 टक्के किंवा सुमारे 30 लाख लोकं आपल्या नोकर्‍या गमावू शकतात. कारण रोबोटिक ऑटोमेशन आणि RPAचा परिणाम याच्यावर होणार आहे.

अहवालानुसार, TCS, Infosys, Wipro, HCL, Tech Mahindra आणि Cognizant सारख्या बर्‍याच कंपन्या RPA अप-स्किलिंगमुळे 2022 पर्यंत 30 लाख लो-स्किल्ड लोकांना कंपनीतून काढण्याचा विचार करत आहेत. अहवालात म्हटले आहे की, भारत-आधारित संसाधनांची वार्षिक किंमत 25 हजार  डॉलर आणि अमेरिकन संसाधनांची वार्षिक किंमत 50 हजार डॉलर आहे. त्यामुळे जर या कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर कंपन्या वेतन आणि कॉर्पोरेटशी संबंधित खर्चावर सुमारे 100 बिलियन डॉलरची बचत करु शकतात

अमेरिकन लोकांच्या नोकऱ्यांवरही ऑटोमेशनचा परिणाम

घरगुती कंपन्यांमधील अंदाजे 7 लाख लोक फक्त RPAसोबचत रिप्लेस केले जातील. तर उर्वरित लोकं ही टेक्नोलॉजी अपग्रेड आणि अपस्किलिंगमुळे कमी केले जाणार आहेत. यामधील RPAचा सर्वात वाईट परिणाम अमेरिकेत होईल. बँक ऑफ अमेरिकेच्या अहवालानुसार, अमेरिकेतील 10 लाख लोकांच्या नोकर्‍या गमावल्या जाऊ शकतात.

भारत, चीनला सर्वाधीक धोका

स्किल डिसरप्शनचा सर्वाधिक परिणाम भारत आणि चीनवर होईल. तर एशियान, पर्शियन आखाती आणि जपानला याचा कमी प्रमाणात धोका आहे.