Investment Tips: कर वाचवण्यासाठी करा Tax Saving Mutual Fund चा वापर, सहजसोप्या पद्धतीनं समजून घ्या गुंतवणूक टीप्स

Best Tax Saving Mutual Funds: आपल्याला जर का कर वाचवायचा असेल तर आपण अनेक गुंतवणूकींच्या (Investment) मागे लागत असतो. आपल्यालाही अशा काही स्किम्स (Schemes) हव्या असतात ज्यातून आपण कर सवलतीचा फायदा घेऊ शकतो तेव्हा जाणून घेऊया ईएलएसएस (ELSS) या स्कीमबद्दल

Updated: Mar 3, 2023, 10:35 PM IST
Investment Tips: कर वाचवण्यासाठी करा Tax Saving Mutual Fund चा वापर, सहजसोप्या पद्धतीनं समजून घ्या गुंतवणूक टीप्स  title=
Tax Saving Mutual Fund invest in elss for better tax benefits read the full article

Investment Tips in Marathi: आपल्या सगळ्यांना आजकाल टॅक्स कसा सेव्ह (Tax Savings) करावा असा प्रश्न अनेकदा पडतो. त्यासाठी आपल्याला टॅक्स फ्री गुंतवणूक (Tax Free Investment) करावीशी वाटते. त्यातून आपला अनेकदा गोंधळ उडतो की अशावेळी कुठे आणि कशी गुंतवणूक करावी? त्यासाठी आपल्यालाही सोप्या आणि सहज अशी टॅक्स फ्री गुंतवणूक करण्यासाठी टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंडचा (Tax Saving Mutual Funds) पर्याय आहे. तुम्ही हा एक पर्याय नक्की आजमावू शकता. टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही चांगलीच गुंतवणूक करू शकता तेव्हा जाणून घेऊया की, तुम्ही कशाप्रकारे या गुंतवणूकीत तुमचे पैसे गुंतवाल आणि तुम्हाला त्यातून कसे कर वाचवता (How to Invest in Tax Saving Mutual Funds) येतील हे जाणून घेऊया. (Tax Saving Mutual Fund invest in elss for better tax benefits read the full article)

आता आपल्या आर्थिक गरजाही (Financial Needs) वाढत जात आहेत त्यामुळे आपल्या कुठतरी सेव्हिंग (Saving) करणेही आवश्यक आहे. त्यातून गुंतवणूकीमुळे आपल्यालाही आपल्या पैशांचे गणित आखावे लागते. आपल्याला फार स्मार्ट पद्धतीनं कसं काय इव्हेस्ट करता येईल याकडे आपल्यालाही लक्ष देणे आवश्यक आहे. आता आपल्यासाठी आपला टॅक्स कसा वाचेल याकडेही आपलं लक्ष राहणं आवश्यक असते. तेव्हा असे काही स्कीम्स आहेत ज्यात तुम्ही गुंतवणूक करू शकता. उदाहरणार्थ, पीपीएफ (PPF), एनपीएस (NPS), ईएलएसएस फंड (ELSS) अशा काही योजनांमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता.  

कशी मिळेल कर सवलत?

तुम्ही जर का जुन्या टॅक्स रिजीमचा (Old Tax Regime Vs New Tax Regime) विचार करत असाल तर त्यासाठी तुम्हाला टॅक्स वाचवताना काही गुंतवणूकही दाखवू शकता. इनकम टॅक्सच्या 80 C मध्ये (Income Tax 80 C) टॅक्स सेव्हिंगबद्दल सांगण्यात आले आहे. यामध्ये इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्किममध्ये (Equity Linked Saving Schemes) गुंतवणूक करू शकता. यातून तुम्हाला एक चांगली कर बचतीची योजना मिळेल. यामधून तुम्हाला अनेक पर्यायही मिळतील.

तुम्हाला यातून एक चांगला फायदा होऊ शकतो. फार छोट्याशा पैशांतून तुम्हाला मोठी रक्कम भविष्यात मिळू शकते. त्यामुळे तुम्हालाही या गोष्टींचा फायदा करू घेता येऊ शकतो. इएलएसएस म्युच्युअल फंडमधून या कलमांतर्गत 80C अंतर्गत 1.50 लाखांपर्यंत कर सवलत मिळते त्यामुळे तुम्ही या म्युच्युअल फंडचा चांगल्याप्रकारे उपयोग करून घेऊ शकता. यात तुम्हाला चांगला परतावाही (Returns) मिळू शकतो. 

लॉन इन पिरियड किती आणि कसा फायदा? 

या योजनेतून तुम्हाला चांगला लॉन इन परियड (Lock in Period) मिळतो. यामध्ये 3 वर्षांचा लॉन इन परियड असतो. या फंडाचा बेन्चमार्क इंडेक्स, एकूण संपत्ती, एनएव्ही या सगळ्याची माहिती काढून घ्यावी. या फंडमध्ये किती गुंतवणूक करता येईल आणि त्यानुसार तुम्हाला किती परतावा मिळेल याची माहिती करून घेणे आवश्यक आहे.