TATA ग्रुपच्या या शेअरवर ब्रोकरेज हाऊसेसची नजर; गुंतवणूकदारांना दिला खास सल्ला

टाटा ग्रुपचा शेअर इंडियन हॉटेल्समध्ये (Indian Hotels Stock)  आज चांगली तेजी दिसून आली. 

Updated: Oct 22, 2021, 04:39 PM IST
TATA ग्रुपच्या या शेअरवर ब्रोकरेज हाऊसेसची नजर; गुंतवणूकदारांना दिला खास सल्ला title=

मुंबई : टाटा ग्रुपचा शेअर इंडियन हॉटेल्समध्ये (Indian Hotels Stock)  आज चांगली तेजी दिसून आली. आज हा शेअर मजबूत होऊन 225 रुपयांपर्यंत पोहचला आहे. सप्टेंबर तिमाहीमध्ये कंपनीची महसुली तुट कमी होऊन 130 कोटी रुपयांच्या आसपास आहे. एका वर्षापूर्वी ही तुट 252 कोटी होती. मोतीलाल ओस्वालने गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. तर Edelweiss ने होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे.

ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओस्वालने म्हटले की, कोविड 19 च्या संसर्गामुळे कंपनीसाठी 2021 हे आर्थिक वर्ष तोट्याचे ठरले आहे. चालू वर्षात कंपनी आपल्या तोट्यातून हळुहळु बाहेर येत आहे. कोरोना निर्बंध शिथिल होत असल्याने हॉटेल इंडस्ट्री पुन्हा तेजीत येणार आहे. 

ब्रोकरेज हाऊसच्या रिपोर्टनुसार कंपनीचा महसुल आणि EBITDA अपेक्षिनुसार चांगला राहिला आहे. Indian Hotels मध्ये गुंतवणूकदारांना खरेदीचा (BUY CALL)सल्ला देण्यात आला आहे. त्यासाठी 268 रुपयांचे लक्ष देण्यात आले आहे. सध्या शेअरचा भाव 204 रुपयांवर ट्रेड करीत आहे.