आता देशात मिळणार 'मेड इन इंडिया' आयफोन; iPhone 15 पासून टाटा समूह करणार निर्मितीला सुरुवात

Tata Make iPhone : जगभरातील प्रसिद्ध उद्योग समूह टाटा ग्रुप आता लवकरच भारतात आयफोन बनवताना दिसणार आहे. त्यामुळे  देशातील सर्वात मोठा आणि जुना औद्योगिक समूह टाटा समूह देखील आयफोन निर्मात्यांच्या यादीमध्ये सामील होणार आहे. तेलंगणानंतर आता बंगळुरुमध्ये टाटामार्फत आयफोन निर्मिती केली जाणार आहे.  

Updated: Apr 10, 2023, 06:26 PM IST
आता देशात मिळणार 'मेड इन इंडिया' आयफोन; iPhone 15 पासून टाटा समूह करणार निर्मितीला सुरुवात  title=

Tata Make iPhone : देशातल्या आयफोन (iPhone) प्रेमींसाठी आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. टाटा समूह  (Tata Group) दक्षिण भारतातील एक मोठा प्लांट ताब्यात घेण्याच्या जवळ आला आहे. यानंतर आता देशाला पहिला घरगुती आयफोन निर्माता मिळणार आहे. त्यामुळे आता टाटा समूह लवकरच भारतात आयफोन बनवताना दिसणार आहे. देशातील सर्वात मोठा आणि जुना असलेला टाटा समूह यफोन निर्मात्यांच्या यादीत सामील होणार आहे. त्यामुळे भारतीयांना आता लवकरच मेड इन इंडिया आयफोन मिळणार आहे.

त्यामुळे आता टाटा समूह लवकरच आयफोन बनवण्यास सुरुवात करण्याची शक्यता आहे. टाटा समूह एप्रिलच्या अखेरीस विस्ट्रॉनच्या (Wistron Group) बंगळुरुमधील आयफोन प्लांटचा ताबा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. बिझनेसलाइनच्या वृत्तानुसार, टाटा समूहाने विस्ट्रॉनच्या प्लांटमध्ये आधीच संघटनात्मक बदल करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता लवकरच भारतात आयफोन निर्मिती सुरु होणार आहे.

तायवानमधील फॉक्सकॉन आणि विस्ट्रॉन या दोन कंपन्या मोठ्या प्रमाणात आयफोनची निर्मिती करते. आयफोनचे भाग जगभरातील विविध पुरवठादारांकडून विकत घेतले जातात. त्यानंतर सर्व भाग या कंपन्यांच्या कारखान्यात पाठवले जातात. दुसरीकडे आता टाटा समूह विस्ट्रॉनचा प्रकल्प हातात घेत असून यामुळे चीनला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आयफोनच्या निर्मितीमध्ये सध्या चीनचा मोठा दबदबा आहे. जगभरातील एकूण आयफोनपैकी 85 टक्के आयफोन चीनमध्ये तयार होतो. कोरोना काळात ही निर्मिती काही प्रमाणात कमी झाली होती. त्यामुळे मोठा तुटवडा निर्माण झाला होता. आता टाटा समूह या स्पर्धेत उतरल्याने भारतातही मोठ्या प्रमाणात आयफोनची निर्मिती होणार आहे.

आयफोन 15 पासून सुरु होणार कारखाना

विस्ट्रॉनकडून प्लांट टेकओव्हर केल्यानंतर, टाटा समूह यामध्ये आयफोन 15 बनवण्यास सुरुवात करण्याची शक्यता वर्तवण्यात येणार आहे. सध्या आयफोन 12 आणि आयफोन 14 चे उत्पादन विस्ट्रॉनच्या बंगळुरुमधील प्लांटमध्ये केले जात आहे. बेंगळुरूचा प्लांट टाटा समूहाकडे गेल्यानंतर विस्ट्रॉन पूर्णपणे भारतीय बाजारपेठेतून बाहेर पडेल. कारण भारतात अॅपलची उत्पादने बनवणाऱ्या कंपनीचा हा एकमेव प्लांट आहे. 

तेलंगाणातही सुरु होणार आयफोन निर्मितीचा कारखाना

आयफोन निर्मात्या फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प महाराष्ट्राच्या शेजारील तेलंगणा राज्यात सुरु होणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या फॉक्सकॉनने (Foxconn) तेलंगणा राज्यामध्ये गुंतवणूक केली आहे. फॉक्सकॉनने इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभारण्यासाठी तेलंगणा सरकारसोबत करार केला आहे. यामुळे येत्या 10 वर्षात एक लाख लोकांना रोजगार मिळेल, असे म्हटले जात आहे. 2 मार्च रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (k chandrashekar rao) यांची फॉक्सकॉनचे अध्यक्ष यंग लिऊ यांची भेट झाली होती. यादरम्यान फॉक्सकॉनने तेलंगणामध्ये मोठी गुंतवणूक करण्याबाबत म्हटले होते. त्यानंतर झालेल्या बैठकीत फॉक्सकॉन तेलंगणामध्ये गुंतवणूक करत असल्याची घोषणा करण्यात आली.