घरी संडास बांधण्याचा शब्द पाळला नाही, म्हणून मुलीकडून पित्याच्या अटकेची मागणी

एका ७ वर्षाच्या मुलीने आपल्या पित्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. या मुलीच्या म्हणण्यानुसार

Updated: Dec 13, 2018, 01:39 PM IST
घरी संडास बांधण्याचा शब्द पाळला नाही, म्हणून मुलीकडून पित्याच्या अटकेची मागणी title=

चेन्नई : तामिळनाडूत एका ७ वर्षाच्या मुलीने आपल्या पित्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. या मुलीच्या म्हणण्यानुसार, तिच्या वडीलांनी आपण घरात संडास बांधू असं सांगितलं होतं, पण त्यांनी अजूनही संडासचं बांधकाम केलेलं नाही, म्हणून त्यांना अटक करा, असा हट्ट या मुलीने पोलिसांकडे धरला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

इ-हानिफा झारा हा मुलीने आपण उघड्यावर संडासला जाणार नसल्याचं सांगितलं. तसेच आपल्याला घरात संडास बांधून देण्याचं वडिलांनी सांगितलं होतं. पण त्यांनी तो बांधून दिला नाही. शेवटी आपल्याला आपल्याच पित्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करावी लागत आहे, असं या मुलीने सांगितलं आहे.

पोलिसांनी सांगितलं की, 'ती ७ वर्षाची लहान मुलगी आपल्या वडिलांना अटक करा, म्हणून अडून बसली होती'. यानंतर आम्ही तिच्या बाबांना पोलीस स्टेशनला बोलवून घेतलं, आणि बापलेकीत सामंजस्य घडवून आणलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ वर्षात १ कोटी टॉयलेट बांधण्याचं ध्येय ठेवलं होतं, पण भारताच्या क्षेत्रफळाच्या मानाने अजूनही अनेक गावांमध्ये टॉयलेट बांधले गेलेले नाहीत.

टाईम्स ऑफ इंडियाने आपल्या बातमीत म्हटलं आहे, त्या मुलीच्या वडीलांना सांगितलं, 'आम्ही २ वेळेस पालिकेला याविषयी सांगितलं की, आम्हाला संडास बांधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्लिन अप कॅम्पेनच्या माध्यमातून सरकारी अनुदान द्यावं, पण त्यांच्याकडून अजूनही कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.'

लाखो भारतीय आजही टॉयलेट सारख्या सुविधांपासून वंचित आहेत, हे ग्रामीणच नाही, तर शहरी आणि उद्योगधंदे असलेल्या भागातलं देखील चित्र आहे.