हैदराबाद : तामिळनाडू आणि पाँडिचेरीमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहेत. या पावसामुळे १७ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, पुढील काही तासांत पाऊस पडण्याची शक्यता असून पावसाच्या इशाऱ्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
तामिळनाडूत मुसळधार पावसाने दैना उडवून दिली आहे. मेट्टूपलायमजवळच्या नादूर गावात चार घरे कोसळली असून या दुर्घटनेत दोन लहान मुलांसह १७ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी पहाटे ही दुर्घटना घडली. नादूर हे गाव कोइमबतोरपासून ५० किमी अंतरावर आहे. सर्व जण गाढ झोपेमध्ये असताना पहाटेच्या ५.३० च्या सुमारास ही घटना घडली.
Tamil Nadu: 15 persons dead after a compound wall collapsed & damaged three houses in Nadoor Kannappan Layout in Mettupalayam today morning, following heavy rain in the region. Rescue operation underway. pic.twitter.com/hLDGlFMiTx
— ANI (@ANI) December 2, 2019
घराजवळ एक २० फूट उंचीची भिंत होती. हीच भिंत घरांवर कोसळल्याने घरे जमीनदोस्त झालीत. घराच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण नअडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाने मदत केली. या बचाव पथकाने सर्व मृतदेह बाहेर काढून मेट्टूपलायममधील सरकारी रुग्णालयात पाठवले आहेत. जोरदार पावसाच्या इशाऱ्यामुळे तामिळनाडू आणि पॉन्डिचेरीमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तामिळनाडूत पुढील दोन दिवसही जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.