मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा मुलाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. नेहमीच त्याच्या क्यूटनेसची चर्चा होत आहे. तैमूर दोन वर्षांचा व्हायचा आहे तरी त्यांची प्रत्येक दिवशी सोशल मीडियावर रोज त्याच्याबद्ल चर्चा होत असते. लोकप्रियेतेच्याबाबतीत तैमूर हा मोठ मोठ्या अभिनेत्री आणि अभिनेतानां मागे टाकत आहे. तर चक्क त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुध्दा लोकप्रियतेच्या बाबतीत चांगलीच टक्कर दिली आहे.
तैमूरची लोकप्रियता इतकी वाढली की गुगूलच्या सर्च इंजनमध्ये सर्वात जास्त सर्च होणारं नाव हे तैमूरचे असते. लोकप्रियतेच्या बाबतीत तैमूरने मोदींना सुध्दा टक्कर दिली आहे की, इतकी जास्त प्रसिद्धी सैफ आणि करिना मिळवता आलेली नाही, तितकी प्रसिद्धी कमी वयात त्याने मिळवलेय.
विशेष गोष्ट म्हणजे करिना आणि सैफला या लिस्टमध्ये जागा मिळालेली नाही. या लिस्टमध्ये तैमूर अली खान दहाव्या नंबरवर आहे. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे पहिल्या क्रमांकावर आहे.
तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तिसऱ्या स्थानवर माजी न्यायाधीश दीपक मिश्रा, चौथ्या क्रमांकावर बँकांना बुडवून परदेशात गेलेला विजय माल्या, तर पाचव्या क्रमांकावर बँकांना बुडवून गेलेला नीरव मोदी आहे आणि सहाव्या क्रमांकावर 'मीटू'च्या प्रकरणात अडकलेला एमजे अकबर आहे. त्याने केंद्र सरकारमधील मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय.
या सोबतच २०१८ मध्ये एका सिनेमाच्या माध्यमातून प्रसिद्धीला आलेली अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर गूगल सर्चमध्ये आघाडीवर आहे. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी या सुध्दा सर्च लिस्टमध्ये आहे. आणि त्यासोबतच बॉलिवूडचा दबंग खान हा सर्वात जास्त सर्च केला गेलाय. अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा पती आणि अमेरीकी गायक निक जोनसला सुध्दा जास्त सर्च केला गेलाय.