'मन की बात'मध्ये वीरपत्नी स्वाती महाडिक - निधी दुबेंचा गौरव

लेफ्टनंट स्वाती महाडिक आणि निधी दुबे यांच्या रुपाने भारतीय लष्कराला दोन वीरांगना मिळाल्या आहेत. या दोन्ही वीरपत्नी साऱ्या देशासाठी प्रेरणादायी आहेत असे गौरवोदगार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत.

Updated: Sep 24, 2017, 04:23 PM IST
'मन की बात'मध्ये वीरपत्नी स्वाती महाडिक - निधी दुबेंचा गौरव title=

नवी दिल्ली : लेफ्टनंट स्वाती महाडिक आणि निधी दुबे यांच्या रुपाने भारतीय लष्कराला दोन वीरांगना मिळाल्या आहेत. या दोन्ही वीरपत्नी साऱ्या देशासाठी प्रेरणादायी आहेत असे गौरवोदगार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत.

'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोदींनी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी वीरपत्नींबाबत हे गौरवोदगार काढले आहेत. 

यावेळी खादी हे वस्त्र नसून एक विचार असल्याचे मोदी म्हणालेत. स्वच्छ भारत अभियानाबाबतही मोदींनी यावेळी आपले विचार मांडले.

या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा देशवासियांना स्वच्छतेचं आवाहन केलं. स्वच्छता अभियानासाठी पेन्शनमधून निधी देणाऱ्या महाराष्ट्राच्या चंद्रकांत कुलकर्णी यांचाही मोदींनी 'मन की बात'मध्ये उल्लेख केला.