लैंगिक शोषणप्रकरण : स्वामी चिन्मयानंद यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

  भाजपचे माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांना न्यायालयीन कोठडीसाठी ठोठावण्यात आली आहे.

ANI | Updated: Sep 21, 2019, 09:14 AM IST
लैंगिक शोषणप्रकरण : स्वामी चिन्मयानंद यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी title=
Pic Courtesy: ANI

लखनऊ : लैंगिक शोषणप्रकरणी आरोप असलेल्या भाजपचे माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीसाठी रवानगी करण्यात आली आहे. स्वामी चिन्मयानंद यांना लैंगिक शोषण, छेडछाड आणि धमकी देण्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आली आहे. काल स्वामी चिन्मयानंद यांना एका सामान्य कैद्याप्रमाणे कोठडीत ठेवण्यात आले होते.

भाजप नेते, माजी मंत्री स्वामी चिन्मयानंद यांना अटक

दरम्यान आरोप करणाऱ्या विद्यार्थीनीलाही चिन्मयानंद यांच्याकडे पाच कोटी रुपये मागण्यासंदर्भातही अटक होऊ शकते. आरोप करण्यापूर्वी या विद्यार्थीनीने आपल्या काही मित्रांसमवेत स्वामी चिन्मयानंद यांच्याकडे पाच कोटी रुपयांची मागणी केली होती. या विद्यार्थीनीच्या तीन मित्रांनाही काल याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.