सुषमा स्वराज यांच्याकडे काश्मीरी विद्यार्थ्याने मागितली मदत पण..

मनीलामधील एका विद्यार्थ्या मदत तर केली पण

Updated: May 10, 2018, 01:50 PM IST
सुषमा स्वराज यांच्याकडे काश्मीरी विद्यार्थ्याने मागितली मदत पण.. title=
नवी दिल्ली : मदतीच्या आवाहनाला सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर दिल्याने परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. यावेळेस त्यांनी फिलीपींसची राजधानी मनीलामधील एका विद्यार्थ्या मदत तर केली पण त्याआधी त्याला समज दिल्याने याची खूप चर्चा होत आहे. परराष्ट्र मंत्र्यांनी सर्वात आधी या विद्यार्थ्याला स्वत:ची प्रोफाइल ठिक करण्याचे आवाहन केलं. त्यानंतर स्वराज यांनी विद्यार्थ्याच्या मदतीसाठी फिलीपींसमध्ये भारतीय एंबेसीला आवाहन केलं. गुरूवारी एका विद्यार्थ्याने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना एक मदतीचे आवाहन करणार ट्विट केल. 'मी एक विद्यार्थी आहे. माझा पासपोर्ट डॅमेज झालाय. मला आपली मदत हवीए. मला भारतात माझ्या घरी परतायच आहे. माझी तब्बेत ठिक नाही.' असे त्याने ट्विट केलं. त्यानंतर सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरच त्याच उत्तर दिल. 

मदतीच आवाहन 

'जर तुम्ही जम्मू काश्मीर राज्यातील आहात तर नक्कीच तुम्हाला मदत मिळेल. पण तुमची प्रोफाइल पाहून कळतय की तुम्ही ऑक्यूपाइड काश्मीरमधील आहात.

भारतात अशी कोणती जागा नाहीए.' असे उत्तर सुषमा स्वराज यांनी दिले. त्यानंतर आपली प्रोफाइल योग्य असल्याचे त्या विद्यार्थ्याने सांगितले. 'मी जम्मू काश्मीर मधूनच आहे. फिलीपींस इथ मेडिसिन कोर्स करतो.' याला लगेचच सुषमा स्वराज यांनी उत्तर दिले. त्या म्हणाल्या, 'तुम्ही आपली प्रोफाइल ठिक केली याचा आम्हाला आनंद आहे.' त्यानंतर इंडियन एंबेसीला टॅग करुन त्या विद्यार्थ्याची मदत करण्यास सांगितले.