मोदी आणि केंद्रातील सरकारवर राहुल गांधी यांचा हल्लाबोल

कर्नाटकातल्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. 

Updated: May 10, 2018, 12:18 PM IST

बंगळुरु : कर्नाटकातल्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.कर्नाटकातली लढाई सिद्धरामय्या विरुद्ध भ्रष्टाचारी रेड्डी बंधू अशीच असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. मोदी सरकारच्या परराष्ट्रनीतीनं देशाची पुरेवाट लागलीय. चीनमध्ये जाऊन डोकलामविषयी मोदी मौन कसं काय बाळगळता? तसेच  मोदी दलितांबद्दल बोलत नाही, दलित हत्याकांडबाबत मोदींचे मौन का, असे सवाल राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित करत टीका केली.

कर्नाटकमध्ये १२ मे रोजी विधानसभा निवडणुकीचे मतदान होत आहे. त्याआधी प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जाहीर प्रचार करण्याची मुभा आहे. या काळात जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत पोहचण्याचा सर्वांचाच प्रयत्न सुरूय. भाजप अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी एस येडियुरप्पा आज बदामी या मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या मतदारसंघात रोड शो करणार आहेत. त्याआधी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मोदींवर जोरदार हल्लाबोल चढवला.

कर्नाटकातल्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राहुल गांधींनी मोदी आणि त्यांच्या सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं.कर्नाटकातली लढाई सिद्धरामय्या विरुद्ध भ्रष्टाचारी रेड्डी बंधू अशीच असल्याचं राहुल गांधींनी म्हटलयं. मोदी सरकारच्या परराष्ट्रनीतीनं देशाची पुरेवाट लागलीय. चीनमध्ये जाऊन डोकलामविषयी मोदी मौन कसं काय बाळगळता?  असा सवाल राहुल गांधींनी केला. पंतप्रधानांनी सोनिया गांधींचं मूळ इटालियन असण्याचा मुद्दाही प्रचारात समोर आणला. त्यालाही राहुल गांधींनी चोख उत्तर देण्याचा प्रयत्न केला.