गांधीनगर : सुरतमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीमध्ये १५ लोकांचा दुर्देवाीरित्या मृत्यू झाला आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं बोललं जात आहे. दरम्यान गुजरातच्या मुख्यमंत्र्यानी सदर घटनेची दखल घेतली आहे. आगीच्या घटनेचं सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना ४ लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे.
आगीतून लोकांना वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरु आहे.
#Visuals Gujarat: A fire broke out on the second floor of a building in Sarthana area of Surat; 18 fire tenders at the spot. More details awaited. pic.twitter.com/iY0O588Pom
— ANI (@ANI) May 24, 2019
सदर घटनेवर नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे. या घटनेमुळे मी दुखी आहे, असे मोदी म्हणाले.
Gujarat CMO on fire at a coaching centre in Sarthana area of Surat: Chief Minister Vijay Rupani has ordered an investigation into the incident. CM has also declared financial help of Rs 4 lakh each to the families of children who died in this incident https://t.co/50oRpdmk5Y
— ANI (@ANI) May 24, 2019
सुरतमधील तक्षशिला कॉम्प्लेक्स भागात ही आग लागली आहे. .या आगीतून आपला जीव वाचवण्यासाठी काही जणांनी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उड्या देखील घेतल्या. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्या आहेत. या आगीत काही प्रमाणात लोकं अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. तसेच मृत्यूची आकडेवारी वाढण्याची भिती आहे.
या इमारतीच्या ४ थ्या मजल्यावर कोचिंग इनस्टीट्यू होते. या इनस्टीट्यू मध्ये ४० विद्यार्थी उपस्थित होते. आग लागल्याचे समजल्यानंतर या विद्यार्थ्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी ४ थ्या मजल्यावरुन उड्या घेतल्या.
दरम्यान आगीवर नियंत्रण आल्याचे समजत आहे.