मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाला 'मृत्यू'

Updated: May 21, 2018, 11:32 PM IST

सूरत : आता आम्ही दाखवतोय एक धक्कादायक बातमी. सूरतमध्ये एक तरूण विजेच्या खांबावर चढून बसला. त्याला खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू होते. लोक त्याची समजूत काढत होते. पण त्याचवेळी अचानक त्याचा तोल गेला.

तो वीज प्रवाहाच्या संपर्कात आला... आणि बघता बघता सगळ्यांच्या देखत तो तरूण मृत्युमुखी पडला. मृत्युचा हा जीवघेणा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यांमध्ये लाइव्ह रेकॉर्ड झाला. 

हा तरूण मानसिक रुग्ण होता, असं सांगितलं जातंय.