सूरत : डम्परने 22 जणांना चिरडले, 15 जणांचा मृत्यू

गुजरातमधील (Gujarat) सूरत (Surat) येथे सोमवारी रात्री उशिरा एक भीषण अपघात झाला. डम्परने एका मुलासह 22 जणांना चिरडले. (Surat Dumper Accident)

Updated: Jan 19, 2021, 08:30 AM IST
सूरत : डम्परने 22 जणांना चिरडले, 15 जणांचा मृत्यू  title=
प्रातिनिधिक फोटो

सूरत : गुजरातमधील (Gujarat) सूरत (Surat) येथे सोमवारी रात्री उशिरा एक भीषण अपघात झाला. सूरतमधील किम रोडवरील डम्परने एका मुलासह 22 जणांना चिरडले. (Surat Dumper Accident) , त्यात 13 जण जागीच ठार झाले. या अपघातात 9 जण जखमी झाले असून त्यांना सूरतच्या एसएमआयएमआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान, जखमींपैकी 2 जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला.

कामगार रस्त्याच्या कडेला झोपले होते

सूरत (Surat) किम रोडवरील रस्त्याच्या कडेला रस्त्यावर झोपलेल्या कामगारांना चिरडून टाकणाऱ्या डम्पर चालकाने स्टीअरिंगवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असल्याचे सूरत पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींमध्ये अनेक लोकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आणि मृतांचा आकडा वाढू शकतो. दरम्यान, घटनास्थळावर कोसंबा पोलीस दाखल झाले आहेत.