Gujarat Murder Case: तंबाखू खात कमरेला हात लावला अन्... 20 वेळा वार करुन निर्दयी बापाने मुलीला संपवलं; कारण ऐकून बसेल धक्का

Father Killed Daughter Gujarat Crime: दिल्लीत एका माथेफिरुने अल्पवयीन मुलीची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच गुजरातमध्येही असाच काहीसा प्रकार घडला आहे. शुल्लका वादातून आरोपीने स्वतःच्याच मुलीची चाकूने सपासप वार करुन निर्घृणपणे हत्या केली आहे. या हत्येनंतर आरोपीने कुटुंबातील इतर सदस्यांनाही गंभीर जखमी केले आहे.

आकाश नेटके | Updated: Jun 1, 2023, 04:00 PM IST
Gujarat Murder Case: तंबाखू खात कमरेला हात लावला अन्... 20 वेळा वार करुन निर्दयी बापाने मुलीला संपवलं; कारण ऐकून बसेल धक्का title=

Father Killed Daughter Gujarat Crime: दिल्लीतल्या (Delhi Crime) शाहबाद डेरी हत्याकांडाची घटना ताजी असतानाच गुजरातच्या सूरतमधूनही (Surat Murder) अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीत दारुच्या नशेत साहिल नावाच्या आरोपीने अल्पवयीन मुलीवर तब्बल 40 वेळा वार करत तिची हत्या केली होती. सूरतमध्येही एका निर्दयी बापाने मुलीची 20 वेळा चाकू खुपसून खून केला आहे. 18 मे रोजी ही घटना घडल्याचे समोर आले आहे. मात्र आता या घटनेचा व्हिडीओ (CCTV) समोर आला आहे. निर्दयी बापाने स्वतःच्या मुलीची चाकूने भोसकून हत्या केली. चाकूने 20 वार केल्यामुळे मुलीचा मृत्यू झाला आहे.

गुजरातमधील सुरतमध्ये टेरेसवर झोपण्याच्या वादातून एका बापाने स्वतःच्याच मुलीची 25 वार करून निर्घृण हत्या केली. आता या हत्येचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सुरत पोलिसांनी वडिलांना अटक केली आहे. सूरतच्या कडोदरा भागात हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले आहे. 18 मे रोजी रात्री 11.20 वाजता ही हत्या झाली.  रामानुज नावाच्या व्यक्तीचा टेरेसवर झोपण्यावरून पत्नीसोबत वाद झाल्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार घडला.

व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये आरोपी रामानुज तंबाखूच्या डबीतून तंबाखू काढतो आणि हातावर मळतो. त्यानंतर तोंडात तंबाखू टाकताच आरोपी रामानुजने कंबरेला लावलेला चाकू काढून पत्नीवर हल्ला करायला सुरुवात केली. वडिलांनी आईवर चाकूने हल्ला केल्यानंतर मुलांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने त्यांनाही सोडले नाही. आईला वाचवण्यासाठी मध्ये आलेली मुलीचा वडिलांनी 20 वेळा वार करुन खून केला.

नेमकं काय झालं?

18 मे रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कडोदरा परिसरातील सत्य नगर सोसायटीत भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका कुटुंबात गच्चीवर झोपण्यावरून जोरदार भांडण झाले. आरोपी पती रामानुज आणि त्यांच्या पत्नीत टेरेसवर झोपण्यावरून भांडण झाले. मुलांनी हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र रामानुजने त्यांनाही सोडले आहे. यावेळी रामानुजने मुलीवर चाकूने सुमारे 20 ते 25 वार केले, ज्यात तिचा मृत्यू झाला. यानंतरही आरोपी थांबला नाही. त्याने पत्नीवरही हल्ला केला आणि टॅरेसकडे धाव घेतली.

खून आणि खुनाच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली पोलिसांनी आरोपी रामानुजला अटक केली आहे. मात्र रामानुजला आपल्या कृत्याचा पश्चातापही नसल्याचे समोर आले आहे. रामानुजने ज्या चाकूने त्याच्या कुटुंबावर हल्ला केला तो चाकूही पोलिसांनी जप्त केला आहे.