नवी दिल्ली : केरळच्या शबरीमला मंदिरात 10 ते 50 वर्षे वयाच्या महिलांना प्रवेश बंदी विरोधातील याचिकेवर आज निर्णय होण्याची शक्यता आहे. दक्षिणेतील महत्वाचे शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. गेल्या चार दिवसात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या महत्वपूर्ण निकालांच्या पार्श्वभूमी आज शबरीमला मंदिराच्या वादावर निकाल महत्वाचा मानला जात आहे.
मासिक पाळी येणाऱ्या महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश वर्ज आहे.या नियमाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलीय. १ ऑगस्टला याप्रकरणीचा सुनावाणी पूर्ण झाली असून, निकाल राखून ठेवण्यात आला आहे.
महिलांच्या मूलभूत हक्कावर मंदिराच्या नियमांमुळे गदा येत असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा आहे. केरळ सरकारनं याप्रकरणी वेळोवेळी भूमिका बदलल्यानं सर्वोच्च न्यायालय नेमका काय निकाल देतं याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.