नवी दिल्ली : अभिनेत्री प्रिया प्रकाशच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने आपला निकाल दिला आहे.
प्रिया प्रकाश आणि तिच्या आगामी सिनेमाचे दिग्दर्शक ओमर लुलु यांच्याविरोधात महाराष्ट्र आणि हैदराबादमध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिका रद्द करण्याची मागणी याचिकेमध्ये करण्यात आली होती. यावर बुधवारी सुनावणी झाली. ज्यामध्ये गाण्याच्या आधारावर प्रिया प्रकाशवर गुन्हा दाखल न करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
Priya Varrier case: Supreme Court stayed all the cases pending against her and said no criminal proceedings to take place against her till further hearing.
— ANI (@ANI) February 21, 2018
प्रिया प्रकाश आणि मल्याळम सिनेमा 'ओरू अडार लव'च्या निर्मात्यांविरोधात तेलंगना आणि महाराष्ट्रातील कथित एक समुदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. तेलंगनामध्ये काही युवकांनी सिनेमाच्या व्हायरल गाण्यातून एका विशिष्ट धर्माच्या भावना दुखावल्याचा आरोप करत दिग्दर्शकांच्या विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला होता.
प्रिया प्रकाशचा मल्याळम सिनेमा 'ओरू अडार लव' 3 मार्च, 2018 ला रिलीज होणार आहे. या सिनेमातील गाणं 'मानिका मलयारा पूवी' आताच रिलीज झालं. या गाण्यातून प्रिया प्रकाश चांगलीच प्रसिद्ध झाली. इंस्टाग्रामवर प्रियाच्या फॉलोअर्सची संख्या 24 तासात 10 लाखांच्या वर गेली. प्रिया आता फक्त 18 वर्षांची आहे. त्रिशूरमधील विमला कॉलेजमध्ये ती बी. कॉम फर्स्ट इयरची विद्यार्थिनी आहे. तिच्या डेब्यू सिनेमात ती एका विद्य़ार्थिनीचा रोल करत आहे.