लिव्ह इन रिलेशनशिपबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

हायकोर्टाचा निकाल रद्द करत सुप्रीम कोर्टाने दिला मोठा निर्णय

Updated: May 7, 2018, 09:43 AM IST
लिव्ह इन रिलेशनशिपबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय title=

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने लिव्ह इन रिलेशनशिपबाबत मोठा निर्णय दिला आहे. मुलीच्या वडिलांनी हायकोर्टात याचिका केल्यानंतर निर्णय त्यांच्या बाजूने लागला. त्यानंतर मुलाने सुप्रीम कोर्टात या विरोधात याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की, जर मुलगा अल्पवयीन नाही आणि तो त्याचं वय 21 वर्षापेक्षा कमी असलं तरी तो लिव इन रिलेशनशिपमध्ये राहू शकतो पण मुलगी ही अल्पवयीन नसावी. सुप्रीम कोर्टाने म्हटलं की, जर मुलीचं वय लग्नाचं नाही आहे तरी ती तिची इच्छा असेल तर ती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू शकते. 

मुलाचं वय 21 वर्षापेक्षा कमी असल्याने हायकोर्टाने मुलीच्या वडिलांची याचिका मंजूर केली होती. मुलीला वडिलांकडे पाठवलं होतं. मुलाने त्यानंतर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. केरळ हायकोर्टाचा आदेश रद्द करत कोर्टाने म्हटलं की, मुलीचं वय 18 वर्षापेक्षा जास्त आहे. मुलगी अल्पवयीन नाही त्यामुळे ती तिच्या इच्छेनुसार राहू शकते. मुलीने म्हटलं होतं की ती तिच्या इच्छेने मुलासोबत राहू इच्छित आहे. त्यानंतर कोर्टाने हा निर्णय दिला आहे.