अयोध्येतल्या वादग्रस्त जमिनीबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

अयोध्येतल्या वादग्रस्त जमिनीबाबत सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या मध्यस्थ प्रक्रियेचे आज भवितव्य ठरणार आहे.  

ANI | Updated: Jul 18, 2019, 09:26 AM IST
अयोध्येतल्या वादग्रस्त जमिनीबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी title=

नवी दिल्ली : अयोध्येतल्या वादग्रस्त जमिनीबाबत सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या मध्यस्थ प्रक्रियेचे आज भवितव्य ठरणार आहे. मध्यस्थ प्रक्रिया रद्द झाल्यास २५ जुलैपासून रोज सुनावणी करण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने याआधीच्या सुनावणीत म्हटले आहे.

न्यायमूर्ती खलिफुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त मध्यस्थ समितीला आपला मध्यस्थीचा विकास अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मध्यस्थ समितीत फारसे काही होत नसल्यामुळे या प्रकरणी वेगवान सुनावणी करण्यात यावी, अशी याचिका गोपालसिंग विशारद यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने गेल्या आठवड्यात समितीला आज अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.