'या' दिवशी दिसणार Supermoon, जाणून घ्या कसा पाहता येणार?

'या' दिवशी दिसणार वर्षातील सर्वांत मोठा चंद्र, जाणून घ्या कधी, कसा, केव्हा पाहता येणार Supermoon

Updated: Jul 11, 2022, 09:11 PM IST
 'या' दिवशी दिसणार Supermoon, जाणून घ्या कसा पाहता येणार?  title=

मुंबई : या वर्षातील सर्वात मोठी खगोलीय घटना जुलैमध्ये घडणार आहे. या महिन्यात नागरिकांना 'सुपरमून' पाहता येणार आहे. सुपरमूनच्या रात्री, चंद्र रोजच्या तुलनेत खूपच मोठा, उजळ आणि गुलाबी चमकतो. हा सुपरमून नेमका कधी, कसा आणि कोणत्या दिवशी पाहता येणार आहे, याची माहिती जाणून घेऊयात.  

सुपरमून कधी दिसणार?
जुलै महिन्यात सुपरमून पाहता येणार आहे. यावर्षीचा सुपरमून 13 जुलैच्या रात्री 12.07 वाजता पाहता येणार आहे. सुपरमूनचे सुंदर दृश्य नागरीकांना पाहता येणार आहे. यानंतर पुढील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये 3 जुलै रोजी दिसणार आहे.

 सर्वात मोठा चंद्र
13 जुलै रोजी वर्षातील सर्वात मोठा चंद्र सुपरमून दिसणार आहे. याला डीअर मून, थंडर मून, विर्ट मून असेही म्हणतात. अमेरिकेत याला सॅल्मन मून, रास्पबेरी मून आणि कॅलमिंग मून असेही म्हणतात. 

अस नाव पडलं सुपरमून 
सुपरमून ही संज्ञा १९७९ मध्ये अस्तित्वात आली. याचा शोध ज्योतिषी रिचर्ड नोएल यांनी लावला होता. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या परिघाच्या 90% च्या आत असतो, तेव्हा या खगोलीय घटनेला सुपरमून म्हणतात.

सुपरमून म्हणजे काय?
सुपरमून ही एक सामान्य खगोलीय घटना आहे. जी वर्षातून तीन वेळा घडते. या दिवशी चंद्रामध्ये काही विशेष शक्ती येतात असे काही नाही. या दिवशी चंद्र रोज पेक्षा मोठा दिसतो कारण तो पृथ्वीच्या अगदी जवळ असतो. या खगोलीय घटनेला पेरीजी असेही म्हणतात.

भरती-ओहोटीची शक्यता
सुपरमूनमुळे समुद्रात भरती-ओहोटीची शक्यता वाढते. या दिवशी समुद्राच्या भरतीची मोठी श्रेणी पाहता येते. सुपरमूनमुळे समुद्रात वादळ निर्माण होऊन किनाऱ्यावर पूरस्थिती निर्माण होऊ शकते.