सुनंदा पुष्कर यांची हत्याच, 'झी मीडिया'च्या हाती महत्त्वाची कागदपत्रं

काँग्रेस खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांनी आत्महत्या केली नव्हती तर ती 'हत्या' होती, असं आता पुढे येतंय.

Shubhangi Palve Updated: Mar 13, 2018, 09:22 AM IST
सुनंदा पुष्कर यांची हत्याच, 'झी मीडिया'च्या हाती महत्त्वाची कागदपत्रं  title=

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांनी आत्महत्या केली नव्हती तर ती 'हत्या' होती, असं आता पुढे येतंय.

साधारण चार वर्षांपूर्वी दिल्लीतल्या पंचतारांकित हॉटेलच्या एका खोलीत सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह सापडला होता. त्यावेळी घटनास्थळी सापडलेले बोटांचे ठसे दिल्ली पोलिसांना ओळखता आले नाहीत. तपासातील या ढिसाळपणेमुळे ही हत्या असल्याचं स्पष्ट झालं नाही.

'झी मीडिया'चं सहकारी वृत्तपत्र 'डीएनए'ला हाती आलेल्या महत्त्वाच्या कागदपत्रांनुसार दिल्ली पोलिसांच्या अंतर्गत चौकशीत पुष्कर यांनी आत्महत्या केली नसून त्यांचा खून झाल्याचं उघड झालंय. त्याचप्रमाणे पोलीस तपास अत्यंत ढिसाळ पद्धतीनं करण्यात आल्याचंही याच अहवालात समोर आलंय.

अहवालानुसार, सुनंदा पुष्कर यांच्या मृत शरीरावर जखमेचे अनेक निशाण होते. हा अहवाल तत्कालीन सहआयुक्तांकडे सोपवण्यात आलाय. दिल्ली पोलिसांच्या पहिल्या अहवालात सुनंदा पुष्कर यांच्या हत्येचा उल्लेख करण्यात आला होता. 

शशी थरुर यांच्याशी २०१० मध्ये विवाह करणाऱ्या सुनंदा पुष्कर यांचा दिल्लीच्या लीला पॅलेस हॉटेलमध्ये १७ जानेवारी २०१४ रोजी गूढ मृत्यू झाला होता.