नवी दिल्ली : मोदी सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी किमान जमा राशी १ हजार रुपयांपासून कमी करून २५० रुपये करण्यात आली आहे. यामुळे आता अधिकाधिक जनतेला याचा फायदा होणार आहे. सरकारने सुकन्या समृद्धी खाते नियम २०१६ मध्ये संशोधन करण्यात आलंय. यानुसार खातं खोलण्यासाठी आता केवळ २५० रुपयांची गरज आहे. वार्षिक १ हजार ऐवजी २५० रुपये जमा करावे लागणार आहेत.
२०१५ साली सुरू झालेली सुकन्या समृद्धी खाते योजना खूप यशस्वी राहिली. नोव्हेंबर २०१७ पर्यंत देशभरात छोट्या मुलींच्यानावे १.२६ कोटी खाती उघडली गेली. या खात्यात एकूण १९ हजार १८३ कोटी रुपये जमा झाले. सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याज दरांचाही इतर अल्प बचत योजना आणि पीपीएफप्रमाणे तिमाही संशोधन केलं जात. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीचे व्याज दर ८.१ टक्के निश्चित करण्यात आले आहेत.
१० वर्षांखालील कोणत्याही मुलीचे सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते खोलता येऊ शकते. सरकारी अधिसूचनेनुसार कोणतेही पोस्ट ऑफिस किंवा सरकारी बॅंकेत हे खाते खोलता येऊ शकते. या खात्यात जमा रक्कमेवर आयकर कायदा कलम ८० सी तून सवलत देण्यात आलीयं. खात्यात वार्षिक दीड लाख पर्यंत रक्कम जमा करता येऊ शकते.
खाते उघडल्यानंतर २१ वर्षांपर्यंत रक्कम भरता येऊ शकते. त्यानंतर मुलीला या खात्यातील रक्कम मिळू लागते. खाते उघडण्याच्या तारखेपासून १४ वर्षांपर्यंत रक्कम जमा करता येते. त्यानंतर त्या वेळेनुसार ठरलेले व्याजदर मिळतात.